शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खताची टंचाई भासणार!

By admin | Updated: June 9, 2017 00:34 IST

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ९८ हजार ३१० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली.

मागणीपेक्षा मंजुरी अधिक: अधिकारी म्हणतात, मुबलक पुरवठा होणारदेवानंद नंदेश्वर। लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने ९८ हजार ३१० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली. कृषी आयुक्तालयाकडून एक लाख तीन हजार ९०० मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी मंजूर करण्यात आली. दि.३० मे अखेर २९ हजार ४४७ मेट्रिक टन रासायनिक खताचा साठा शिल्लक आहे. दरवर्षीे शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध होत नसल्यामुळे यावर्षी मागणीपेक्षा पुरवठा अधिक असूनही शेतकऱ्यांना वेळेवर रायायनिक खतांचा पुरवठा होईल काय, याविषयी संभ्रमावस्था आहे.मागील पाच वर्षांचा अनुभव लक्षात घेता जिल्ह्यात रायायनिक खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई यावर्षी जाणवू नये, यासाठी जिल्हा परिषदेने खतांची मागणी वाढवून मागितली. कृषी आयुक्तालयाकडून १ लाख ३ हजार ९०० मेट्रीक टन खत मंजूर करण्यात आले आहे. शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करीत असताना पिकांसाठी लागणाऱ्या ९८ हजार मेट्रिक टन खताची मागणी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली. यात १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत १९४४ मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. पुरवठा करण्यात आलेला व मागील वर्षाचा शिल्लकसाठा मिळून २९४४७ मेट्रिक टन खत शिल्लक आहे. सद्यस्थितीत या खताची ७५ मेट्रीक टन विक्री झालेली आहे.सन २०१७ च्या खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेची युरिया खताची मागणी ४७ हजार ३५५ मे.टन होती. यात ४६ हजार ९०० मे.टन मंजूर करण्यात आले. तर ३१ मार्चपर्यंत ६६९३.९० मे.टन युरिया शिल्लक होता. ३१ मेपर्यंत ४०४ मे.टन पुरवठा करण्यात आला. या खताची ५० मेट्रीक टन विक्री झालेली आहे. एकूण युरियाचा ७०४७.९ मे.टन साठा शिल्लक आहे. तसेच डीएपी खताची मागणी ४ हजार ९७१ मे.टन असून १४ हजार २०० मे.टन मंजूर करण्यात आले. पूर्वीचा शिल्लकसाठा ५०४.३५ मे.टन होता. त्यात पुरवठा करण्यात आलेल्या ७४ मे. टनाची भर पडून सध्या ५७८.४ मे. टन साठा शिल्लक आहे. एमओपी खताची मागणी ६२३ मे. टन असून चार हजार २०० मे.टन मंजूर करण्यात आले. ११४.९२ मे. टन मागील शिल्लक असून १४८.९ मे. टन पुरवठा करण्यात आला. सध्या १४८.९ मे. टन एमओपी शिल्लक आहे. एसएसपी खताची मागणी ९ हजार ९९९ मे. टनाची होती. १९ हजार १०० मे. टन मंजूर झाले. शिल्लक साठा १० हजार ८२० मे.टन असून पुरवठा ९७ मे. टन झाला. असा एकूण शिल्लकसाठा १० हजार ९१७ मे.टन आहे.याशिवाय १५.१५.१५, २०.२०.०, २०.२०.१३, २४.२४.०, १२.३२.१६, १६.१६.१६ या खतांचीही खरिपासाठी मागणी करण्यात आलेली आहे. मात्र सद्यस्थितीत या रासायनिक खतांच्या मागणीला मंजुरी मिळाली नसल्याचे समजते. मात्र या खतांचा मागील वर्षाचा काही साठा शिल्लक असल्याचे जि. प. कृषी विभागाने सांगितले आहे.आता खत खरेदीसाठी लागणार "आधार"आता शेतकयांना खत खरेदीसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना खतासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानातील गैरप्रकार कमी होण्यास यामुळे मदत होणार आहे. शेतकऱ्यांना खते हवी असल्यास कृषी सेवा केंद्रात जाताना बरोबर आधारकार्ड न्यावे लागणार आहे. याठिकाणी असलेल्या मशीनवर आधार नंबरची नोंदणी झाल्यानंतर हाताचा अंगठा मशीनवर द्यावा लागणार आहे. त्यामुळे तेथेच बिल तयार केले जाऊन शेतकऱ्यांना खत मिळणार आहे. म्हणजेच खते शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष हातात पडल्यानंतरच कंपन्यांना अनुदान मिळणार आहे.