शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 21:49 IST

कास्ट्राईब कल्याण महासंघाची सभा बुधवारी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांच्या दालनात घेण्यात आली.

ठळक मुद्देकॉस्ट्राईबची सभा : सहायक आयुक्तांचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कास्ट्राईब कल्याण महासंघाची सभा बुधवारी येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांच्या दालनात घेण्यात आली.सभेमध्ये संघटनेच्या वतीने मागासवर्गीय कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी व जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थी यांच्या विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यामध्ये सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना नियमित कामावर ठेवण्यात यावे, बीव्हीजी कंपनीचा कंत्राट ३१ मार्चला संपत असून सदर कंत्राट ज्या दुसऱ्या कंपनीला होणार आहे त्यामध्ये दुसºया कंपनीचा कंत्राट होताना आज कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर ठेवावे, तशी शिफारस सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात येवून न्याय द्यावा, कंत्राटी कर्मचारी घेताना जिल्ह्यातीलच उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, कोणत्याही कंत्राटी कर्मचाºयाला कामावरून कमी करण्यात येवू नये, निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने कोणत्याही कर्मचाºयांची बदली करण्यात येवू नये, शासकीय मुलींचे वसतिगृह भंडारा येथील शिपाई पदावर कार्यरत डहाट या नियत वयोमानानुसार ३० एप्रिलला सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांचे सेवानिवृत्ती प्रकरण तात्काळ तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात यावे, नियमित कार्यरत कर्मचाºयांना दर महिन्याला वेतन स्लीप देण्यात यावी, सन २०१३ पासून जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला याची माहिती देण्यात यावी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी विभागाचे अधीक्षक सुखदेवे, लिपीक सायरे उपस्थित होते. शिष्टमंडळात राज्याचे उपमहासचिव सूर्यभान हुमणे, जिल्हाध्यक्ष विनय सुदामे, सचिव हरिश्चंद्र धांडेकर, उपाध्यक्ष सिद्धार्थ भोवते, अ‍ॅड.बाबूराव दामले, मनोहर मेश्राम, हरिकिशन अंबादे, युवराज रामटेके, अशोक डांगरे, पृथ्वीराज भालाधरे, डहाट, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.