शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

महिनाभरात रोहयोचा थकीत निधी उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 21:28 IST

भंडारा जिल्ह्यात रोहयो अंतर्गत कुशल कामाच्या निधी अभावी २४ कोटी रूपयाची देयके अडली आहेत. यामुळे ग्रामीण भागात विकास प्रभावित ठरत असल्याने जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू : सभापती धनेंद्र तुरकर यांची सकारात्मक चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : भंडारा जिल्ह्यात रोहयो अंतर्गत कुशल कामाच्या निधी अभावी २४ कोटी रूपयाची देयके अडली आहेत. यामुळे ग्रामीण भागात विकास प्रभावित ठरत असल्याने जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या शिवाय सकारात्मक चर्चा केली. महिना भरात थकीत निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.भंडारा जिल्ह्यात ग्रामीण भागात गेल्या दोन वर्षापासून कुशल कामे करण्यात आली आहेत. याशिवाय योजनेतून नव्याने कुशल कामे प्रस्तावित व मंजूर करण्यात आली आहेत. परंतु थकीत निधी उपलब्ध करण्यात येत नसल्याने नव्याने प्रस्तावित कुशल कामांना यंत्रणा हात जोडून नमस्कार करीत आहे. नव्याने मंजुरी प्रदान करण्यात आलेली विकास कामे सुरू करण्यात आली नाही.यामुळे गावात होणाऱ्या विकास कामांना ब्रेक मिळाला आहे. या योजने अंतर्गत कुशल कामांचा नाव घेतले असता यंत्रणा नाक तोंड दाबत आहे. गावात मजुरांना रोजगार आणि गावांचा चेहरा मोहरा बदलविणारी योजना म्हणून आशेचे बघीतने जात आहे. परंतु सरसकट निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामपंचायत स्तरावर पदाधिकारी टेंशन घेताना दिसून येत आहे. मजुरांची ओरड आणि रोष थेट ग्रामपंचायतच्या पदाधिकाºयांचे दिशेने जात असल्याचे त्यांचे हिताचे विचार करताना पदाधिकारी आराखडा घेत आहे. दरम्यान गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील तालुक्यांना कुशल कामाचे थकीत निधी देण्यात आला नाही. २४ कोटी रूपयांचे घरात निधी अडला असल्याने साहित्य धारक आणि पुरवठा धारकांचे ओरडणे सुरू झाले आहे. गावात देयकांचे प्राप्ती वरून भांडणे सुरू झाले आहे. या थकीत निधी करिता जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती धनेंद्र तुरकर यांनी जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांना निवेदन दिले.ग्रामीण भागात प्रभावित कामाचे बाबतीत त्यांनी विस्तृत चर्चा केली आहे. निधी नसल्याने यंत्रणा थकल्याचे माहिती त्यांनी दिली. या चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. महिला भरात संपूर्ण निधी उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन चर्चे दरम्यान त्यांनी दिले. यावेळी यशवंत सोनकुसरे, मोहगावचे सरपंच उमेश कटरे, सिहोराचे सरपंच मधु अडमाचे, चंद्रशेखर बन्सोड उपस्थित होते.जिल्ह्यात शिक्षकांचे पद रिक्तभंडारा जिल्ह्यात शिक्षकांचे १८२ पदे रिक्त आहेत. यामुळे दर्जेदार शिक्षण देण्याचे प्रयत्नात रिक्त पदे आडकाठी ठरत आहेत. विहाराचे पदे रिक्त आहेत. यामुळे ग्रामीण भागात शिक्षणाची गुणवत्ता ठासळत आहे. शिक्षण हे वाघीनीचे दुध असल्याचे म्हटले जात असले तरी या दुधालाच आटविण्याचा हा प्रयत्न आहे. शासन स्तरावर रिक्त पदे भरण्याचे प्रयत्न झाले पाहिजे, अशी माहिती धनेंद्र तुरकर यांनी दिली आहे.विकास कार्यासाठी हजार कोटींची गरजभंडारा जिल्ह्यात विकास कार्यासाठी अनेक विभाग कार्यरत आहेत. या विभागांना अर्धवट निधी उपलब्ध करण्यात येत आहे. यामुळे विशेषत: ग्रामीण भागात विकासाचे लचके तोडली जात आहे. गावांना जोडणारे पूर्ण रस्ते बांधकाम करता येत नाही. इमारती बांधकामाचा बेधडक कार्यक्रम राबविता येत नसल्याची माहिती धनेंद्र तुरकर यांनी दिली आहे.निधी अभावी जिल्ह्यात प्रभावी विकास कार्यक्रम राबविताना सर्वच विभागांना अडचणीचे ठरत आहे. विकास कार्यासाठी १ हजार कोटीचे निधी उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.-धनेंद्र तुरकर, सभापती अर्थ व शिक्षण समिती भंडारा.