शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

लबाडी आली अंगलट

By admin | Updated: November 8, 2016 00:32 IST

विधान परिषद निवडणूक आणि घोडेबाजार हे सर्वश्रुत समिकरण असते. त्यामुळे वाहत्या गंगेत हात धुण्याची संधी कुणी सोडत नाही.

विधान परिषद निवडणूक : दुसऱ्याच्या बायकोला समोर करून घेतले ‘टोकन’भंडारा : विधान परिषद निवडणूक आणि घोडेबाजार हे सर्वश्रुत समिकरण असते. त्यामुळे वाहत्या गंगेत हात धुण्याची संधी कुणी सोडत नाही. यापूर्वी अनेकवेळा अशी संधी साधता आल्यामुळे काही महाभाग संधीच्या शोधात राहतात. यापूर्वीच्या निवडणुकांत फावले असले तरी या निवडणुकीत मात्र हा प्रकार एकाच्या चांगलाच अंगलट आला आहे.भंडारा - गोंदिया विधान परिषद निवडणुकीत आठ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस या तीन प्रमुख राजकीय पक्षात होणार आहे. दिवाळी आटोपताच स्वपक्षाच्या मतदारांसह मिळेल त्या मतदारांना (देवदर्शनासाठी) उचलण्यात येत आहे. यात सर्वच पक्षांकडून स्वपक्षातील मतदारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. परंतु काही पक्षातील मतदार अजूनही गावात असल्यामुळे त्यांच्यावर सर्वच राजकीय पक्षांची नजर आहे. दरम्यान, तुमसर तालुक्यातील मतदार असलेली महिला जिल्हा परिषद सदस्य पतीसोबत चार दिवसांपूर्वी १० वाजून १० मिनिटांनी भारतभ्रमणावर गेली. ही महिला मतदार भ्रमंतीवर गेल्याचे कळताच ‘अच्छे दिन’चा नारा देणाऱ्यामधील एका महाभागाने तिसऱ्या व्यक्तीला समोर करून दुसऱ्याच्या बायकोला मतदार असल्याचे सांगून आपल्याच पक्षातील उमेदवाराकडून ‘टोकन’ म्हणून काही रक्कम उकळली. त्यानंतर दुसऱ्या पक्षातील एक मतदार गळाला लागला, असे अविर्भावात सांगत ‘टोकन’ स्वत:जवळ ठेऊन घेतली. हा सर्व प्रकार गुरूवारला दिवसभराच्या घडामोडीत पार पडला. त्यानंतर नवीन मतदारांची गोळाबेरीज उमेदवाराच्या निकटवर्तीयाला रात्री उशिरा कळली. त्यानंतर सोबतच्या कार्यकर्त्याने मतदारयादीत वाढीव ‘एक’ची नोंद करीत असताना त्याचा या नावावर संशय बळावला. हा मतदार दुसऱ्या पक्षाचा असून तो आधीच फिरायला बाहेर गेल्याचे माहित असल्यामुळे हा मतदार सापडला कसा? अशी शंका निर्माण झाली. शंकेचे निरसन करण्यासाठी सोबतच्या कार्यकर्त्याने त्या जिल्हा परिषद सदस्य महिलेच्या पतीशी रात्री १२ वाजताच संपर्क साधला. हॅलो... भाऊ कुठे आहेस, असे विचारताच, मी व वहिणी बाहेरगावी आहे, असे सांगितल्यानंतर फोन बंद केला. या वार्तालापानंतर उमेदवाराचे निकटवर्तीय व त्या कार्यकर्त्याने या घडामोडीमागील ‘सुत्रधार’ असलेल्या व्यक्तीच्या घरी रात्रीच धडक दिली. झोपेतून त्यांना उठविण्यात आले. ‘आज तुम्ही आम्हाला दिलेला तो मतदार नको, त्याच्यासाठी दिलेले ‘टोकन’ परत द्या’, असा प्रश्न समोरच्या मंडळीने केला. त्यावर ‘टोकन’ ज्यांनी घेतले त्यांच्याकडे असल्याचे त्या महाशयाने सांगितले. त्यानंतर त्यांचे वाहन मोहगावच्या दिशेने निघाले. रात्रीच त्या इसमाचे घर गाठले. झोपेतून जागा झालेल्या त्या इसमाची समोरच्यांना बघताच दातखिळी बसली. भांबावलेल्या त्या इसमाने बनवाबनवीच्या या प्रकाराची कबुली दिली. त्यानंतर ‘टोकन’ परत घेण्यात आले. आणि या प्रकरणातील बिंग फुटले. दोन दिवस कानोकानी नसलेली ही खबर रविवारला दबक्या आवाजात सुरू झाली. आणि या घटनेमागील ‘सूत्रधाराचे’ किस्से रंगू लागले... (जिल्हा प्रतिनिधी)