शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

एकलारी रस्ता झाला मृत्यूमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:59 IST

वरठी-एकलारी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. वरठी पासून एक किमी अंतरावर असलेल्या एकलारी गावाला जाणारा हा रस्ता परिसरातील अनेक गावाना जोडणारा एकमेव रस्ता आहे. दिवस रात्र वाहन व पादचाऱ्यांचा रेलचेल असणाऱ्या या रस्त्याची अवस्था अतंत्य दयनीय आहे. एक किमी अंतराच्या रस्त्यावर शेकडो मोठमोठे खड्डे पडले आहेत.

ठळक मुद्देअपघातात वाढ : वरठीपासून एकलारीपर्यंत खड्डेच खड्डे

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : वरठी-एकलारी हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. वरठी पासून एक किमी अंतरावर असलेल्या एकलारी गावाला जाणारा हा रस्ता परिसरातील अनेक गावाना जोडणारा एकमेव रस्ता आहे. दिवस रात्र वाहन व पादचाऱ्यांचा रेलचेल असणाऱ्या या रस्त्याची अवस्था अतंत्य दयनीय आहे. एक किमी अंतराच्या रस्त्यावर शेकडो मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे दुर्घटनांना कारणीभूत असून विध्यार्थी व नागरिकां करिता डोकेदुखी ठरत आहेत. वरठी- एकलारी रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वरठी - एकलारी रस्ता हा परिसरातील अनेक गावाना जोडणारा रस्ता आहे. वरठी हे गाव केंद्र ठिकाण असल्यामुळे एकलारी, नेरी, बीड, सातोना येथून वरठीला येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शालेय शिक्षणा करिता परिसरातील शेकडो विध्यार्थी दररोज वरठीला येतात. या रस्त्याची अवस्था वाईट असल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे.वरठी- एकलारी - बीड हा रास्ता डांबरी असला तरी डांबरीकरण दूर दूर पर्यंत दिसत नाही. या मार्गावर पडलेले असंख्य खड्डे हे दुर्घटनाना आमंत्रण देणारे आहेत. वरठी - एकलारी रस्त्यांवर पडलेले खड्डे म्हंणजे एकप्रकारचे विश्वरीकार्ड ठरत आहेत. रस्त्यावर पडणारे खड्डे हे नेहमीचे असले तरी वरठी- एकलारी मार्गावर असलेले खड्ड्यात स्वरूप म्हंणजे एकप्रकारचे छोटेखानी डबक्याप्रमाणे आहेत. वरठी येथून एकलारी ला जाण्यासाठी असलेल्या वळण मार्गावर पडलेले खड्डा म्हणजे तलावाचं असल्यासारखा भासतो.वरठी - भंडारा राज्य महामार्ग सोडून राष्ट्रीय महामागार्ला जोडणारा हा रस्ता आहे.नागपूर जिल्ह्यातील गावाना जाण्याकरिता शॉर्टकट मार्ग असल्यामुळे रस्त्यावरून दिवस रात्र रहदारी सुरु राहते. पण रस्त्यावर पडलेले खड्डे आणि उखडलेले रस्ता हे जिल्ह्यातील अन्य रस्त्यांची स्थिती दर्शविते. दर दोन फुटावर या प्रमाणे मोजता येणार नाही असे असंख्य खड्डे पडले आहेत. नुसते खड्डे पडले नसून त्यात पावसाचे पाणी जमा झाल्यावर एखादा अपघात झाल्यास खड्यात पडलेले वाहन बुडून जाईल अशी अवस्था आहे. या मार्गावर अनेक वळण मार्ग आहेत. प्रत्येक वळण मार्गावर असलेले खड्डे म्हंणजे अपघाताला आमंत्रण ठरणारे आहेत.वरठी ते एकलारी व एकलारी ते बीड गावाला जोडणारा हा रस्ता खड्ड्यामुळे त्रासदायक ठरला आहे. सध्या पावसाचे दिवस सुरु असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी जमा राहते. यामुळे या रस्त्यावरून जाणाºया वाहन चालकांना खड्डे पडल्याचे दिसत नाही आणि ते नकळत अपघाताला समोर जातात. पाणी भरलेल्या खड्ड्यातून धावणाऱ्या वाहनांमुळे पायी चालणाऱ्या पादचाऱ्याना त्रासदायक ठरत आहे. याचा सर्वात मोठा फटका विध्यार्थ्यांना बसतो. खड्ड्यातील घाण पाणी अंगावर उडाल्याने त्यांना शाळेत जाण्यापासून मुकावे लागते. रस्त्याची वाईट अवस्था जिल्हा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षतेचे उदाहरण आहे. सदर रस्ता रास्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक