शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
येमेनमध्ये केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशी टाळणारे हे 94 वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा? जाणून घ्या
3
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
4
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
5
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
6
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
7
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
8
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
9
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
10
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
11
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
12
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
13
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
14
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
15
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
16
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
17
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
18
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
19
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
20
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

अंतिम संस्कारातही मायेची सावली नाही...

By admin | Updated: May 30, 2016 00:56 IST

जीवनातला अंतिम क्षण हा मृत्यू असतो. या क्षणाचा साक्षीदार मृत्यू बनत नसतो. दाहसंस्कार ही जीवनातील अंतिम प्रक्रिया असते.

मृत्यूनंतरही थट्टा : मोहाडी तालुक्यात ३६ गावात स्मशानशेड नाही, ६४ गावांच्या स्मशानभूमीत पाण्याची सोय नाहीराजू बांते मोहाडीजीवनातला अंतिम क्षण हा मृत्यू असतो. या क्षणाचा साक्षीदार मृत्यू बनत नसतो. दाहसंस्कार ही जीवनातील अंतिम प्रक्रिया असते. नाश पावलेल्या देहाचा संस्कार करावा लागतो. संपूर्ण आयुष्य सुखात व स्वत:च्या शरीराला जपणारा हा व्यक्ती अग्नीत लोप पावतो. तथापि या निर्जीव देहाला काही काळ तरी मायेची सावली मिळावी ही किमान अपेक्षा नातलगांची असते. पण मोहाडी तालुक्यातील ३६ गावात स्मशान शेड नसल्याने मृतात्मा तपत्या सुर्यात/ पाण्यापावसात जाळावा लागतो.मृत्यूनंतर मुखाग्नी दिली जाते. पण मृत्यूपर्व सुखात राहणारा मनुष्य प्राणी विविध स्तरावर संघर्ष करीत असतो, ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक संकटाचा सामना गरीब, श्रीमंत आपल्यापरीने करीत असतो. जिवंतपणी उन्हाचा दाह कमी करण्यासाठी निवारा म्हणून घर असतो. घरात पंखा, कुलर लावला जातो, पावसाच्या बचावासाठी रेनकोट छत्र्यांचा वापर केला जातो. अशाप्रकारे स्वत:ला जपत असतो. स्वत:ला जपणारे शरीर एक दिवस परलोकी जातो. देहलोकी शरीरावर अंतिम संस्कार केला जातो. तत्पूर्वी त्याच्या पार्थिवाला सावली दिली जाते. अग्नीस्थानी चिता ठेवली जाते तेव्हा मायेची सावली दूर केली जाते. त्यानंतर जळणाऱ्या देहाला वरच्या मायेच्या सावलीचे पांघरुन असावे यासाठी शासनातर्फे श्मशासन शेड निर्माण केले जाते. तथापि, अंतिम संस्कारातही त्या मृत्युरुपी शरीराला ३६ गावात मायेची सावली मिळत नसल्याचे दिसून आले आहे.अंतिम संस्कार करण्यासाठी धर्मापुरी, भोसा, चिचोली, देवूळगाव, बिटेखारी, नरसिंहटोला, देव्हाडा बू. ढिवरवाडा, किसनपूर, कान्हळगाव, मुंढरी, काटे बाम्हणी, लेंडेझरी, केसलवाडा, डोंगरदेव, बोंडे, मोरगाव, महालगाव, मालिदा, बोटेश्वर, जांभळपाणी, दवडीपार, मुंढरी खू. निलज बू., निलज खू., पालडोंगरी, पांढराबोडी, बोरी, पिंपळगाव चोरखमारी, सकरला, नेरला, सितेपार झं., शिवनी, ताडगाव, सिहरी फुटाळा निवारा तयार केला गेला नाही. तसेच महसूल विभागाकडे श्मशानभूमीची नोंद नाही, अशी अकरा गाव आहेत. मोरगाव, वासेरा, ताडगाव, मुंढरी खू., मलीदा, जांभोरा, किसनपूर या गावाचा समावेश आहे. या गावात प्रेत पुरण्यासाठी गावात जमीन नाही. ज्या गावात जन्माची नाळ गाडली जाते. त्याच भूमित आपली अंतीम संस्कार व्हावा, अशी अनेकाचंी इच्छा असते. पण, गावच्याच मातीत अंतीम संस्कार करण्यासाठी गावची भूमि मिळत नाही ही चिंतेची बाब आहे.गाव तिथे अंतिम संस्कार निवारा असावा. मातीत संस्कार करण्यासाठी स्मशानभूमी असावी, असे असताना स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्षीही अंतिम संस्काराच्या सोयी सुविधा करण्यास प्रशासन दूर राहिला आहे. ६४ गावात श्मशानभूमीवर हातपंपाची सोय नाही. उन्हाळ्यात नाले, नद्या कोरड्याठक पडतात. त्यावेळी स्मशानघाटावर हातपंप असले तर अंतीम संस्काराचे सुतक करण्यासाठी पाण्याचा वापर होईल. तसेच अंतीम संस्कारासाठी जमलेल्या आप्तमंडळींना कोरडे घसे ओले करता येतील.स्मशानभूमीवर ना श्मशानशेड ना पाण्याची सोय करण्यासाठी कोणत्याच शासनाने आवश्यक पावले उचलली नाही. मृतात्मा जाळतानाही दु:ख अन् त्यांच्या परिवारालाही वेदना देण्याचं काम शासन करीत आहे..डबक्यातील पाण्याने अग्निसंस्कारअंतिम संस्कारासाठी पाणी महत्त्वाचे असते. पण ६४ गावात स्मशानघाटावर पाण्याची व्यवस्था नाही. अग्निदाह करण्यापूर्वी मुखाग्नी देणारे नातलग पाण्याने ओले होतात. मगच शवाला मुखाग्नी देण्याची रित पार पाडतात. मुखाग्नी देण्याचा संस्कार करण्यापूर्वी पाणी घरुन तर काहींना शेतशिवारातून पाणी आणावे लागते. काही तर डबक्यातील साचलेलं पाणी अंगावर शिंपडून अग्नी संस्कार करतात.