शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

अंतिम संस्कारातही मायेची सावली नाही

By admin | Updated: May 25, 2014 23:20 IST

मृत्यू हा जीवनातील अंतिम क्षण असतो. या क्षणाचा साक्षीदार मृत्यू आलेला बनत नसतो. त्याचा देह असते नाशिवंत. पण या नाश पावलेल्या देहाचा संस्कार करावाच लागतो. स्वत:च्या शरीराला जपणारा हा

राजू बांते -मोहाडी

मृत्यू हा जीवनातील अंतिम क्षण असतो. या क्षणाचा साक्षीदार मृत्यू आलेला बनत नसतो. त्याचा देह असते नाशिवंत. पण या नाश पावलेल्या देहाचा संस्कार करावाच लागतो. स्वत:च्या शरीराला जपणारा हा व्यक्ती मृत्यूनंतर जळणार्‍या देहाला किमान काही काळ तरी मायेची सावलीमिळत नसल्याचे तालुक्यात दिसून आले आहे.

ऊन, वारा व पाऊस या नैसर्गिक संकटाचा सामना गरीब / श्रीमंत आपापल्या परीने करीत असतो. जीवंतपणी उन्हाचा दाह कमी करण्यासाठी घर असतो. घरात कुलर, पंखा, ए.सी. लावला जातो. पावसाच्या बचावासाठी रेनकोट, छत्र्यांचा वापर केला जातो. प्रत्येक व्यक्ती स्वत:ला जपत असतो. मृत्यूनंतरही त्याच्या देहलोकी शरीराला अग्नी देईपर्यंत जपणार्‍या संस्कार केला जातो. पण तो देह पूर्ण जळेपर्यंत त्याच्या जळणार्‍या देहाला वरच्या मायेच्या सावलीचा पांघरून मिळावा यासाठी स्मशानशेडची योजना आहे. पण मोहाडी तालुक्यात ४१ गावात स्मशानशेडची व्यवस्था नाही आहे. यात वासेरा, देऊळगाव, ताडगाव, पालडोंगरी, मलिदा, आंधळगाव, अकोला, चिचोली, शिवनी, सालेबर्डी, पांढराबोडी, काटेबाम्हणी, सालई बु., भिकारखेडा, महालगाव, पारडी, वडेगाव, सितेपार, दहेगाव, पिंपळगाव, भोसा, नेरी, बोथली, बीड सितेपार, देव्हाडा बु., निलज बु., निलख खु, नवेगाव बु., मोहगाव, करडी, करडी, मुंढरी खु., मुंढरी बु., कान्हळगाव / करडी, बोरी, किसनपूर, केसलवाडा, बोरगाव, ढिवरवाडा, खडकी, बोंद्रे, डोंगरदेव आदी गावात स्मशानशेडची कमतरता आहे. त्याशिवाय अंतिम संस्कारासाठी मातीत देह पुरण्यासाठी १४ गावात स्मशानभूमी नसल्याची माहिती दिसून आली. यात ढिवरवाडा, केसलवाडा, कान्हळगाव, मुंढरी, बोरगाव, मोरगाव, फुटाळा, ताडगाव, मुंढरी, मलीदा, सिरसोली का., घाटकुरोडा, जांभोरा, किसनपूरचा गावांना स्मशानभूमीच नाही. तसेच महसूल विभागाकडे स्मशानभूमीची नोंद नाही असे अकरा गावे आहेत. मोरगाव, वासेरा, फुटाळा, भिकारखेडा, धर्मापूरी, ताडगाव, मुंढरी खु., मलीदा, जांभोरा, किसनपूर या गावांचा समावेश आहे. खरा प्रश्न भेडसावतो त्या १४ गावांना ज्यांना प्रेत पुरण्यासाठी गावात जमीन नाही. ही बाब विधानसभेत विचारली गेली होती. स्थानिक आमदारांनी तारांकीत प्रश्न विधानसभेत मांडला गेला होता. ज्या गावात जन्माची नाळ गाडली गेली त्यासाठी घरची भूमी वापरात येते. मात्र त्यांचे मातीत अंतिम संस्कार करण्यासाठी गावाची भूमि मिळत नाही ही बाब विचार करणारी आहे.

गाव तेथे स्मशानशेड असावे. मातीत संस्कार करण्यासाठी स्मशानभूमी असावी असे असताना स्वातंत्र्यांच्या ६७ व्या वर्षीही अंतिम संस्काराच्या सोयी सुविधा करण्यास प्रशासन / शासन दूर राहिली आहे. ही बाब एवढ्यावरच थांबली नाही. अंतिम संस्काराचे सोयरसूतक करण्यासाठी पाण्याचीही मोठी बोंब असते. गावच्या स्मशानभूमीत एक तरी हातपंप असावे अशी किमान मागणीही शासन पूर्ण करू शकलेला नाही. उन्हाळ्यात नाले, ओढे, नद्या कोरड्या पडतात अशा वेळी अंतिम संस्कार करण्यासाठी पंचवीस कि.मी. अंतरावर असणारी वैनगंगा नदीवर नेणे हाच एक पर्याय असतो. पण हे सगळ्यांनाच जमत नाही. त्याचा पर्याय शोधला जातो. नजीकच्या विहिरीवरून पाणी शोधून अंतिम संस्काराचे सूतक केले जातात. लहान नदीमध्ये रेती ओढून पाण्याचा शोध लावूनही मोठय़ा कष्टाने अंतिम संस्कार केले जात आहेत. मृत्यूनंतरही थट्टा थांबविण्यासाठी शासनाने स्मशानभूमी, एक हातपंप, शोकमंडपाची सुविधा करणे गरजेचे आहे.