सामान्य प्रशासनाची दिरंगाई : वस्तीशाळा शिक्षकांची उपासमारभंडारा : जिल्ह्यातील वस्तीशाळा निमशिक्षकांना संबंधित विभागाने आदेश न दिल्यामुळे गेल्या पाच महिन्यापासून ना मानधन ना वेतन अशी झालेली आहे. निम शिक्षकांची स्थिती खालावली आहे.राज्यातील वस्तीशाळा निमशिक्षकांना महाराष्ट्र शासनाने १ मार्च २०१४ पासून जिल्हा परिषदेच्या शाळेवर सहा शिक्षक म्हणून सेवेत कायम केले तसा अध्यादेश महाराष्ट्र राज्याचे अप्पर सचिव प्रकाश सावळे यांच्या स्वाक्षरीनिशी जारी करण्यात आला. त्या अनुषंगाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेनी आपापल्या जिल्ह्यातील निमशिक्षकांना आदेश व वेतन दिलेत. शेजारच्या गोंदिया जिल्ह्यातील संबंधितांच्या उदासीनतेमुळे आणि सामान्य प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आदेश मिळण्यास पाच महिन्यापासून विलंब होत असल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेनी वस्तीशाळा शिक्षकांसोबत घेऊन दि. २५ जुलै रोजी उपमुख्य कार्यपालन अधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिलेत. त्यात मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन दि. २६ जुलैला आटोपताच त्यांना आदेश देण्याचे आश्वासन दिलेत. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन व निमशिक्षकांचे आदेश यांचा काडीमात्रही संबंध नसताना उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन दि. २६ जुलै आटोपून १ आठवडा लोटून जात आहे. पण आजतागायत आदेश देण्यात आले नाहीत. संघटनेनी आतापर्यंत वारंवार निवेदने भेटी घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. पण अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली. येत्या ७ आॅगस्टपर्यंत आदेश व वेतन दिले नाही तर जिल्ह्यातील २९ निमशिक्षकांचे काम बंद करून व त्यांना सोबत घेऊन संघटना ८ आॅगस्ट रोजी आंदोलन करेल यात गोंदिया जिल्ह्यातून २०४ शिक्षकांचे समर्थन तसेच इतरही जिल्ह्यातून वस्तीशाळा शिक्षक / सहाय्यक शिक्षक सहभागी होतील असे शिष्टमंडळांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)
पाच महिन्यांपासून वेतन नाही
By admin | Updated: August 1, 2014 00:09 IST