शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मोहगाव हद्दीत वृक्षाची लागवड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 23:17 IST

सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत रनेरा ते मोहगाव खदान गावापर्यंत राज्य मार्गाचे दुतर्फा वृक्ष लागवडीचे नियोजन आखण्यात आले आहे.

ठळक मुद्देनियोजित जागेवरून वृक्ष बेपत्ता : १५ लाख खर्चाचे नियोजन चुकले, वृक्षांना सुरक्षा कवच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत रनेरा ते मोहगाव खदान गावापर्यंत राज्य मार्गाचे दुतर्फा वृक्ष लागवडीचे नियोजन आखण्यात आले आहे. प्रत्यक्षात हरदोली आणि मोहगाव खदान गावाचे दृष्टीत वृक्ष लागवड करण्यात आली नाही. यामुळे निधी खर्चाचे आलबेल करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.सिहोरा परिसरात असणाºया रनेरा, हरदोली गावाचे हद्दीत जंगलाचे क्षेत्र आहे. याच गावातून तुमसर-बपेरा राज्य मार्ग आहे. या राज्य मार्गाचे दुतर्फा वृक्ष लागवडीचे नियोजन सामाजिक वनिकरण विभाग मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात आले आहे. वृक्षाचे लागवड खर्चाना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून वृक्ष लागवड, वृक्षाचे संवर्धन तथा अन्य कार्यासाठी १३ लाख ५५ हजार ५३९ रूपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. सामाजिक वनिकरण विभागाने रनेरा ते जंगलपर्यंत दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या शिवाय जंगलात जनावरे शिरणार नाही. याकरिता झाडाचे फांद्या तोडून सुरक्षा भिंत तयार करण्यात आली आहे. १० दिवसात या सुरक्षा भिंतीची नासधुस झाली आहे. प्रत्यक्षात दोन कि़मी. अंतर पर्यंत वृक्ष लागवडीचे नियोजन असताना अर्धा कि़मी. पर्यंत वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे दीड कि.मी. पर्यंत मोहगाव खदान आणि हरदोली गावाचे हद्दीत वृक्षाची लागवड करण्यात आली नसल्याने आलबेल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. रस्त्याचे दुतर्फा वृक्ष लागवडीचे नियोजन असताना उर्वरित जागेवर दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली नाही.ज्या जागेत वृक्षाची लागवड करण्यात आली आहे, अशा वृक्षांना सुरक्षा कवच नाही. यामुळे लागवड करण्यात आलेले वृक्ष जिवंत राहणार किंवा नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. अर्धा कि़मी. अंतर पर्यंत करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीचे संगोपन व संवर्धन करण्यात येत नाही. लाखो रूपये खर्चाचे नियोजन असताना सामाजिक वनिकरण विभागाचे दुर्लक्ष करण्यात येत आहे. दरम्यान या संदर्भात अधिक माहितीसाठी हरदोलीचे सहायक वन परिक्षेत्र कार्यालयात माहितीसाठी संपर्क साधण्यात आले असता त्यांनी तुमसर कार्यालयाचे कार्यक्षेत्रात असल्याची माहिती सांगण्यात आली.