शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पीडितेच्या न्यायाबाबत दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 23:20 IST

लाखांदूर येथील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणात आरोपींना अटक केली.

ठळक मुद्देशंकरराव लिंगे : जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लाखांदूर येथील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणात आरोपींना अटक केली. मात्र त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून आवश्यक असलेले सहकार्य न मिळाल्याने पीडितेचे कुटुंब आजही भयभीत अवस्थेत असल्याचा आरोप अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केला आहे.पीडित मुलीला प्रशासनाने दीड लाखांची मदत दिली आहे. तर अखिल भारतीय माळी महासंघाच्या माध्यमातून दोन लाखांची मदत दिल्याची माहिती यावेळी लिंगे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. दरम्यान या प्रकरणातील आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांची महिन्याभरात सुटका झाली. यामुळेच याप्रकरणात पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप लिंगे यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी, या आशयाचे निवेदन प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे यांच्या नेतृत्वात अखिल भारतीय माळी महासंघाने गुरूवारला पोलीस अधीक्षक तथा जिल्हाधिकारी यांना निवेदनातून केली आहे.यावेळी केलेल्या मागण्यांमध्ये आरोपींना फाशीची शिक्षा होण्याच्या दृष्टीने अ‍ॅड. उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडित मुलीला न्याय द्यावा, पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियाला २५ लाखांची सानुग्रह मदत शासनाने द्यावी, कारवाईत अडथडा निर्माण करणाºया पोलीस कर्मचाºयांवर कारवाई करावी, चित्रफित सोशल मिडियामध्ये प्रसारित करणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, जि.प. सदस्य रेखा भुसारी, प्रकाश अडाळकर, अनिल किरणापुरे, बी.एम. मदनकर, आशिष नंदुरकर, संजय सावरकर, साधु नागरिकर, शिला कांबळे, डॉ. राजेश नंदुरकर, गुलशन पात्रिकर, महादेव पात्रिकर, प्रिया शहारे, सोनिया डोंगरे आदी उपस्थित होते.‘त्या’ चित्रफितीपासून पोलीस अनभिज्ञपीडित मुलीची चित्रफित सोशल मीडियाच्या एका साईटवर प्रसारित केली आहे. याप्रकरणी शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली असता, त्याची कल्पनाच त्यांना नसल्याचे सांगितले. त्यानंतर साईटचे नाव सांगितल्यानंतरही त्यांच्याकडे ती उघडली नाही. त्यांच्यामुळे त्यांच्या संगणक प्रणालीवर शंकरराव लिंगे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.