शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

देशद्रोहींना माफी नाहीच

By admin | Updated: February 20, 2016 01:31 IST

देशद्रोही कार्य करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. त्यांचा नायनाट करण्यासाठी कठोरात कठोर कायदा करण्याची गरज आहे, ...

जनस्वाभिमान अभियानांतर्गत कार्यक्रम : तारिक कुरैशी यांचे प्रतिपादनभंडारा : देशद्रोही कार्य करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही. त्यांचा नायनाट करण्यासाठी कठोरात कठोर कायदा करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी यांनी केले. येथील गांधी चौकात जनस्वाभिमान अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार नाना पटोले, आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आ. चरण वाघमारे, आ. बाळा काशीवार, डॉ. प्रकाश मालगावे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी काँग्रेसपक्ष नक्षलवादी व आतंकवादीच्या माध्यमातून राजकारणासाठी उपयोग करीत आहे. हे कार्य शोभनिय नाही. याचा विरोध केला पाहिजे, असे मार्गदर्शन केले. यावेळी देशद्रोहासाठी पोलिसांतर्फे धडक कारवाई सुरू असून अनेकांना पकडण्यात आले आहे. या कारवाईचा उपस्थितांनी समर्थन केले आहे. याप्रसंगी डॉ. युवराज जमईवार, रामकुमार गजभिये, भरत खंडाईत, बोळणे गुरूजी, बाबु ठवकर, विजय जयस्वाल, चंद्रशेखर रोकडे, रमेश खेडीकर, पद्माकर बावनकर, आबिद सिद्धीकी, नरेंद्र वंजारी, प्रशांत खोब्रागडे, सुनिल मेंढे, विकास मदनकर, अरुण भेदे, प्रमोद धार्मिक, संजय मते, मयुर बिसेन, अलिम खान, इरशाद, कलीम खान, आशिष मोहबे, शितल तिवारी, प्रकाश पांडे, रामप्रकाश धुत, नितीन मलेवार, डॉ. गोविंद कोडवानी, दिनकर गिरडकर, मुन्ना फुंडे, शेषराव वंजारी, एकनाथ बावनकर, विलास गोबाडे, सुभाष धांडे, अ‍ॅड. विनोद भोले यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी देशहितासाठी देशातील नागरिकांनी देशद्रोह करणऱ्यांवर धडा शिकविण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे. देशात आतंकवाद पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा सडेतोड उत्तर देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांसह देशातील नागरिकांनी पुढाकार घेवून देशप्रेमाची भावना जोपासणे आवश्यक आहे. संचालन नगरसेवक सुर्यकांत ईलमे यांनी केले. आज सकाळपासून गांधी चौकात भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. ग्रामीण भागातून कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी आले होते. कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)