शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘तिथे’ जडीबुटीने केला जातो ‘सर्पदंशा’वर मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:05 IST

पालोरा येथील अमरकंठ मेश्राम १५ प्रकारच्या रोगांवर जडीबुटीच्या माध्यमातून धर्मार्थ व नि:शुल्क उपचार करीत असून ....

ठळक मुद्देशेकडोंना लाभ : पालोरा येथील अमरकंठचा १७ वर्षांपासून नित्यक्रम

युवराज गोमासे ।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : पालोरा येथील अमरकंठ मेश्राम १५ प्रकारच्या रोगांवर जडीबुटीच्या माध्यमातून धर्मार्थ व नि:शुल्क उपचार करीत असून कोका वन्यजीव अभयारण्यातून भटकंती करुन जडीबुटी मिळवितात. आता पर्यंत शेकडों लोकांना साप, विंचू, कुत्रा, मुळव्याध, किडनीस्टोन, प्रसुतवाई, ठाण (गाठ) वात, लकवा, नपुंसकता, मिया, काटेमिया, खजरी, कानफुटी, चालनीकाटा तसेच अन्य आजारांवर निशुल्क औषधांचे वाटप व लेप लावतात. लाभ होत असल्याने दु:खी होऊन येणारे उपचारानंतर हसत बाहेर पडत असल्याची सुखद अनुभूती रूग्णांना येत आहे.पालोरा येथील अमरकंठ सितकुरा मेश्राम (५७) यांचे शिक्षण चवथीपर्यंत झाले असून मजुरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात. घरची मंडळी त्यांना या धर्मार्थ कार्यासाठी मदत करतात. मागील १७ वर्षापासून त्यांचा हा औषधी देण्याचा व लेप करुन उपचाराचा नित्यक्रम सुरु आहे. मोहाडी, तुमसर, भंडारा तालुक्यात त्यांच्या धर्मार्थ कार्याची माहिती असून नागरिक मोठ्या अपेक्षेने रुग्णांना घेऊन त्यांच्याकडे पोहोचतात. मेश्राम यांना त्यांचे वडील सितकुरा मेश्राम यांच्याकडून हा वारसा मिळालेला आहे. त्यांचे वडीलही धर्मार्थ कामात अग्रेसर होते. जडीबुटीच्या माध्यमातून उपचार करण्यात त्यांचा हातखंडा होता.त्यांच्या पत्नीला दोनदा सर्पदंश झाला होता. खडकी/पालोरा येथील होलबाजी भालाधरे हे साप व विंचूच्या औषधांचे वैद्य म्हणून प्रसिध्द होते. त्यांनी उपचार केले. सर्पदंशातून ती सुखरुप बचावली.होलबाजींनी पालोरा गावात धर्मार्थ औषध देणारे कुणीही नसल्याचे ओळखून विविध औषधांची माहिती व विधी त्यांना सांगितली. प्रत्यक्ष कार्याची माहिती दिली. त्यांच्याबरोबर जंगलात भटकंती करुन औषधांची ओळख व गुणधर्म जाणून घेतल्याचे अमरकंठ सांगतात. ते सन १९९० पासून औषधांचे वितरण करीत असून शेकडो लोकांना त्यांनी विषमुक्त केले.वनविभाग दखल घेईल काय?कोका वन्यजीव अभयारण्यातील दुर्मिळ वनौषधींचा उपचार करीत अनेकांना लाभ मिळाला आहे. अमरकंठ अल्पशिक्षित असल्याने त्यांना वनैषधींचे शास्त्रीय नाव माहित नाहीत. मात्र, उपचाराच्या पध्दती त्यांना कळतात. वनविभाग त्यांच्या कार्याची व अनुभवाची दखल घेणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे.