शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

माडगी रेती घाटातून सर्रास रेतीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST

महसूल प्रशासनाची मूक संमती : खनिकर्म विभाग कारवाई करणार काय? तुमसर : तुमसर तालुक्यातील पांजरा येथील घाटावर भंडारा येथील ...

महसूल प्रशासनाची मूक संमती : खनिकर्म विभाग कारवाई करणार काय?

तुमसर : तुमसर तालुक्यातील पांजरा येथील घाटावर भंडारा येथील खनिकर्म विभागाच्या पथकाने धडक दिली. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माडगी येथे घाटातून दररोज राजरोसपणे रेतीची चोरी सुरू असताना महसूल व खनिकर्म विभाग कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. दोन्ही विभागाने येथे मूक संमती दिली काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माडगी गावाच्या प्रवेशद्वारावरच रेती तस्करांनी प्रचंड मोठा रेती साठा केला आहे. तेथून जेसीबीद्वारे टिप्परमध्ये रेती भरण्यात येते. नदीपात्रातून ट्रॅक्टरद्वारे ही रेती रेतीसाठ्यात जमा केली जाते.

तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर माडगी गाव असून गावाशेजारूनच वैनगंगा नदी वाहते. येथील नदीपात्रात रेतीचा मोठा साठा होता; परंतु मागील दोन ते अडीच महिन्यांपासून रेती तस्करांनी नदीचे पात्र पोखरून टाकले आहे. दिवसाढवळ्या नदीपात्रातून रेतीचे उत्खनन सुरू आहे. ट्रॅक्टरद्वारे नदीपात्रातील रेती गावाच्या प्रवेशद्वाराजवळ आणून रेतीचा साठा करण्यात येतो. येथे मोठा रेती साठा उपलब्ध आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत नदीपात्रातून रेतीचा उपसा केला जातो. महसूल प्रशासनाने हा रेती घाट लिलाव केला नाही. माडगी गाव व नदीपात्राचे अंतर अतिशय कमी आहे. गावाच्या सुरक्षेकरिता व घाटाचे क्षेत्रफळ कमी असल्याने महसूल प्रशासनाने येथे रेती घाटाचा लिलाव केला नाही; परंतु दुसरीकडे येथे तस्करांनी प्रभावशील लोकांना हाताशी धरून रेती चोरी सर्रास सुरू केली आहे. रेती चोरी करणारे तालुका बाहेरचे आहेत. महसूल मुख्यालयापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर हा रेती घाट आहे. या गावात महसूल प्रशासनाचा कर्मचारी कर्तव्यावर राहतो; परंतु अजूनपर्यंत या रेती तस्करावर कोणतीच कारवाई झाली नाही. रेती चोरीची मुभा कोणी दिली हा संशोधनाचा विषय आहे.

गावाच्या प्रवेशद्वारावर रेती साठ्यातून जेसीबीने ट्रक व टिप्पर भरून त्याची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे; परंतु अद्याप त्यावर कारवाई करण्यात आली नाही. तीन दिवसांपूर्वी रेतीच्या एका ट्रकने गावाचे प्रवेशद्वार भुईसपाट केले; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. यामुळे पाणी कुठेतरी मुरत आहे असे दिसून येते. नियमावर बोट ठेवणाऱ्या महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आतापर्यंत लाखो रुपयांची रेती या रेती घाटातून चोरी करण्यात आली. रेती चोरी करणे व तिची वाहतूक करणे हा मोठा गुन्हा आहे असे सांगण्यात येते; परंतु माडगी घाटात असा नियम दिसून येत नाही.