शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वाघाने एक महिन्यात केली पाच जणांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 00:04 IST

गत वर्षी १६ डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील देवीदास गायकवाड या व्यक्तीची पहिली शिकार केली या वाघाने केली होती. तेव्हापासून आतापर्यंत १३ जणांचा बळी घेतला. त्यात जून महिन्यात तब्बल ५ व्यक्तींची शिकार केली असून, त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील दोन तर गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील तीन व्यक्तींचा समावेश आहे.

दयाल भोवते लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तीन जिल्ह्यांत १३ जणांचा बळी घेणाऱ्या सीटी-१ वाघाने एकाच जून महिन्यात पाचजणांची शिकार केल्याची माहिती पुढे आली आहे. चंद्रपूर दोन आणि गडचिरोली  जिल्ह्यात तिघांना ठार मारले होते. सध्या वळसा परिसरात वाघाचा संचार असून, त्याला बेशुद्ध करून पकडण्यासाठी वन विभागाचे शीघ्र कृती दल आणि शार्प शूटर जंगलात तळ ठोकून आहेत.  चिमूर टायगर अर्थात सीटी-१ या वाघाने मागील दहा महिन्यांत भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांत दहशात निर्माण केली आहे. गत वर्षी १६ डिसेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील देवीदास गायकवाड या व्यक्तीची पहिली शिकार केली या वाघाने केली होती. तेव्हापासून आतापर्यंत १३ जणांचा बळी घेतला. त्यात जून महिन्यात तब्बल ५ व्यक्तींची शिकार केली असून, त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील दोन तर गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील तीन व्यक्तींचा समावेश आहे.वाघाला पकडण्यासाठी तीनही जिल्ह्यातील वन कर्मचारी सज्ज असून, गडचिरोली जिल्ह्यातील वडसा जंगलात त्याचा सध्या संचार असल्याची माहिती आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने जंगलात ६१ ट्रॅप कॅमेऱ्यासह वाघाच्या मार्गावर पाच मचानी उभारल्या आहेत. तेथे खडा पहारा सुरू आहे. मात्र, हा वाघ सर्वांना हुलकावणी देत आहे. 

या व्यक्तींचा घेतला बळी- देवीदास गायकवाड (रा. चिमूर), प्रमोद चौधरी (रा. दहेगाव, लाखांदूर), जयपाल कुंभरे (रा. इंदोरा, लाखांदूर), मधुकर मेश्राम (रा. कुरुड, वडसा), अजित नाकाडे (रा. शिवराजपूर, वडसा), राजेंद्र कांबळी (रा. हळदा, ब्रह्मपुरी), देवीदास कांबळी (रा. हळदा, ब्रह्मपुरी), वासुदेव मेश्राम (रा. इंजेवारी, आरमोरी), किशोर मामीडवार (रा. पोर्ला, आरमोरी), सागर वाघरे (रा. बोरी, आरमोरी), प्रेमलाल प्रधान (रा. उसेगाव, वडसा), विनय मंडल (रा. इंदोरा, लाखांदूर) आणि तेजराम कार (रा. कन्हाळगाव, लाखांदूर).

 

टॅग्स :Tigerवाघ