शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

महावितरणचा शॉक; महिन्याच्या वीजबिलात किमान 65 रुपये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 05:00 IST

गत महिन्यातील जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांचे बिल वाढणार असून, याचा फटका भंडारा शहर व जिल्ह्यातील सुमारे दोन लाख ७१ हजार २४० घरगुती ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे आधीच महागाईने होरपळणाऱ्या ग्राहकांना महावितरणने चांगलाच शाॅक दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार, महावितरणने इंधन समायोजन आकारात वाढ केली आहे. नुकतेच वीज दरवाढीचे आदेश काढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महावितरणने दोन महिन्यांपूर्वी ग्राहकांना सुरक्षा ठेव रकमेच्या नावाखाली वाढीव वीजबिले आकारल्यानंतर, आता पुन्हा वीजनिर्मितीसाठी कोळसा व इंधनाचे दर वाढल्याचे कारण देत, इंधन समायोजन आकारामध्ये वाढ केली आहे. गत महिन्यातील जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांचे बिल वाढणार असून, याचा फटका भंडारा शहर व जिल्ह्यातील सुमारे दोन लाख ७१ हजार २४० घरगुती ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे आधीच महागाईने होरपळणाऱ्या ग्राहकांना महावितरणने चांगलाच शाॅक दिला आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार, महावितरणने इंधन समायोजन आकारात वाढ केली आहे. नुकतेच वीज दरवाढीचे आदेश काढले आहेत. मात्र, याबाबत अद्याप महावितरणच्या परिमंडळ स्तरावर कुठलेही आदेश प्राप्त झाले नाही.

१००युनिट पर्यंत सर्वाधिक ग्राहकांचा वापरजिल्ह्यात बहुतांश ग्राहकांचा १०० युनिटपर्यंत विजेचा वापर आहे. त्यांना ६५ रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसणार आहे. तर ५०१ पेक्षा जास्त युनिट वापरणाऱ्यांची संख्या कमी आहे.

भारनियमनाने परेशानसध्या कोळशाचा तुटवडा आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून भारनियमन केले जात आहे. शहरी भागात भारनियमन नसले, तरी ग्रामीण भागात मात्र भारनियमन सुरु आहे.

२.७१ लाख घरगुती वीजग्राहकभंडारा जिल्ह्यात दोन लाख ७१ हजार २४० घरगुती ग्राहक आहेत. महावितरणने दरवाढ केल्याने याचा फटका या ग्राहकांना बसणार आहे. कृषी ग्राहकांनाही मोठा फटका बसणार आहे.

पाच महिन्यांसाठी दरवाढ वीजनिर्मितीसाठी कोळसा व इंधनाचे दर वाढल्याचे कारण देत, इंधन समायोजन आकारामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यातील जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांचे बिल वाढणार असून, याचा फटका घरगुती ग्राहकांना बसणार आहे.

इंधन समायोजन आकारामध्ये वाढ करून लागू केलेली वीज दरवाढ म्हणजे ग्राहकांची लूट आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जीवनावश्यक वस्तूही महागल्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे अवघड झाले आहे. त्यात पुन्हा महावितरणने दरवाढीचा शाॅक दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहे.- महेश रणदिवे, ग्राहक.

 

टॅग्स :electricityवीज