शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचा सर्वांगीण विकास हेच माझे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

नितीन गडकरी म्हणाले, येथे पिकणाऱ्या धानाच्या तणसापासून इथेलाॅन तयार केले जाणार आहे. त्यामुळे तरुणांना राेजगार उपलब्ध हाेईल. या भागात पर्यटनाची उत्तम संधी आहे. आंभाेरा व नागझिरा या क्षेत्रात पर्यटनाच्या दृष्टिकाेनातून चांगले प्रकल्प हाती घेतले आहेत. देव्हाडा साखर कारखान्याची गाळप क्षमता दाेन हजारांहून पाच हजार केली आहे. त्यामुळे धान व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले.

लाेकमत न्यूज नेटवर्कसाकाेली : दर्जा, पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरणाचा विचार करून साकाेली व लाखनी येथे देशातील सर्वाेत्कृष्ट उड्डाणपूल बांधले आहे. स्टेट ऑफ आर्ट म्हणून या पुलाची दखल घेतली जाईल. विदर्भाचा सर्वांगीण विकास हेच माझे स्वप्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.साकाेली व लाखनी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या लाेकार्पण साेहळ्यात ते बाेलत हाेते. कार्यक्रमाला खासदार सुनील मेंढे, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधरराव जिभकाटे, आमदार डाॅ. परिणय फुके,  जिल्हाधिकारी संदीप कदम, भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, तारीक कुरैशी, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी मंत्री राजकुमार बडाेले, साकाेलीचे माजी आमदार बाळा काशिवार, डाॅ. हेमकृष्ण कापगते, रेखा भाजीपाले, नेपाल रंगारी, माहेश्वरी नेवारे, वनिता डाेये आदी उपस्थित हाेते.नितीन गडकरी म्हणाले, येथे पिकणाऱ्या धानाच्या तणसापासून इथेलाॅन तयार केले जाणार आहे. त्यामुळे तरुणांना राेजगार उपलब्ध हाेईल. या भागात पर्यटनाची उत्तम संधी आहे. आंभाेरा व नागझिरा या क्षेत्रात पर्यटनाच्या दृष्टिकाेनातून चांगले प्रकल्प हाती घेतले आहेत. देव्हाडा साखर कारखान्याची गाळप क्षमता दाेन हजारांहून पाच हजार केली आहे. त्यामुळे धान व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले.गडकरी यांनी सुरुवातीला उड्डाणपुलाचे निरीक्षण करून फीत कापून लाेकार्पण केले. त्यानंतर हाेमगार्ड परेड ग्राऊंडवर डिजिटल पद्धतीने लाेकार्पण केले. प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राजू अग्रवाल यांनी केले. यावेळी खासदार सुनील मेंढे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उड्डाणपुलाच्या बांधकामात याेगदान देणाऱ्या चमूंचा सत्कार केला.

उड्डाणपुलाला शामरावबापू कापगते यांचे नाव- साकाेली येथील उडाणपुलाला दिवंगत शामरावबापू कापगते यांचे नाव देण्यात यावे, अशी सातत्याने मागणी हाेत हाेती. बापूंचे कार्य पाहता ती मागणी याेग्यच हाेती. त्यांनी समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करून समाज घडविला. यापुढे साकाेली उड्डाणपूल शामरावबापू कापगते उड्डाणपूल या नावाने ओळखला जाईल, अशी घाेषणा ना. गडकरी यांनी केली.सहाशे काेटी गुंतवणुकीचा इथेनाॅल प्रकल्प- जिल्ह्यात साखर कारखान्यात ६०० काेटी रुपयांची नवीन गुंतवणूक करून इथेनाॅल निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची घाेषणा ना. गडकरी यांनी केली. पायाभूत सुविधांचा माध्यमातून जिल्ह्याचा विकास करणार, असे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी