शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

सभापती निवडीत अध्यक्ष निवडणुकीचाच फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 05:00 IST

समाजकल्याण सभापतीपदासाठी काँग्रेसकडून वडद गटाचे मदन रामटेके, तर विरोधी गटाकडून धारगाव गटाच्या अपक्ष अस्मिता डोंगरे यांनी, महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी काँग्रेसच्या केसलवाडा गटाच्या स्वाती वाघाये यांनी, तर भाजपच्या एकोडी गटाच्या माहेश्वरी नेवारे आणि लाखोरी गटाच्या सुर्मीला पटले यांनी नामांकन दाखल केले. पटले यांनी नामांकन मागे घेतले.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद सभापती निवडणुकीत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीचाच फॉर्म्युला कायम ठेवत काँग्रेसने सभापतीपदावरही वर्चस्व मिळविले. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत समाजकल्याण सभापतीपदी काँग्रेसचे मदन रामटके, महिला व बालकल्याण सभापतीपदी काँग्रेसच्या स्वाती वाघाये, तर दोन इतर सभापतीपदी कॉंग्रेसचे रमेश पारधी व अपक्ष राजेश सेलोकर यांची वर्णी लागली.   समाजकल्याण सभापतीपदासाठी काँग्रेसकडून वडद गटाचे मदन रामटेके, तर विरोधी गटाकडून धारगाव गटाच्या अपक्ष अस्मिता डोंगरे यांनी, महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी काँग्रेसच्या केसलवाडा गटाच्या स्वाती वाघाये यांनी, तर भाजपच्या एकोडी गटाच्या माहेश्वरी नेवारे आणि लाखोरी गटाच्या सुर्मीला पटले यांनी नामांकन दाखल केले. पटले यांनी नामांकन मागे घेतले. इतर दोन सभापतीपदासाठी काँग्रेसकडून बपेरा गटाचे रमेश पारधी यांचे, तर विरोधी गटाकडून शिवसेनेच्या सावरला गटाच्या राजश्री तिघरे आणि देव्हाडी गटाचे अपक्ष राजेश सेलोकर यांच्या विरोधात मुरमाडी तुपकर गटाचे गणेश निरगुडे यांनी नामांकन दाखल केले होते. प्रत्येक सभापतीपदासाठी दोन-दोन नामांकन आल्याने मतदान घेण्यात आले. यात २७ विरुद्ध  २५ असे मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे यांनी काम पाहिले.

तुमसरचे वर्चस्व; तीन तालुक्याला भोपळा- काँग्रेस व राष्ट्रवादी मतभेद झाल्यानंतर काँग्रेसने भाजपा बंडखोर गटाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. अध्यक्षपद पवनी तालुक्याला तर उपाध्यक्षपद तुमसर तालुक्याला मिळाले होते. तुमसर तालुक्याच्या वाट्याला दोन     सभापतीपद मिळाले. त्यामुळे तुमसर तालुक्याला सर्वाधिक तीन पदाधिकारी मिळाले. जिल्हा परिषदेत साकोली व लाखनी तालुक्याला संधी मिळाली. मोहाडी, लाखांदूर व भंडारा तालुक्याला भोपळा मिळाला.- काँग्रेसकडून सभापतीपदासाठी अनेक जण इच्छुक होते. निवडणुकीच्या दोन तास आधी महिला जिल्हा परिषद सदस्याने नाराजी व्यक्त करीत निघून गेल्या. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळण्याची चर्चा होती. परंतु सभा सुरू होण्याआधी नाराजी दूर करण्यात यश आले. काँग्रेस पुन्हा एकवटल्याने विरोधकांना संधी मिळाली नाही.- अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या वेळी भाजप आणि बंडखोर यांच्यात सभागृहातच हाणामारी झाली. वाद पोलीस ठाण्यात पोहोचला होता. विरोधात गुन्हेही दाखल झाले होते. सभापती निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र निवडणूक शांततेत पार पडली.- सभापतींची निवडणूक पार पडताच विजयोत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक वाद्य डफळीचा आवाज जिल्हा परिषदेच्या आवारात गुंजला. यावेळी विकास फाउंडेशनचे माजी आमदार चरण वाघमारे, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, मधुकर लिचडे, प्रेमसागर गणवीर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अटकपूर्व जामीन मिळाला अन् मनसुबे उधळले- गुन्हा दाखल असलेल्या उपाध्यक्षांसह एका सदस्याला बुधवारी अटकपूर्व जामीन मिळाल्याने सभापतीपदासाठी उत्सुक असलेल्या विरोधकांचे मनसुबे उधळले गेले. अध्यक्ष निवडीच्या वेळी सभागृहात हाणामारी झाली होती. त्यावरून जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप ताले आणि सदस्य उमेश पाटील यांच्यासह सभापती नंदू रहांगडाले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सभापती निवडणुकीच्या वेळी ते सभागृहात येतील त्यावेळी त्यांना पोलीस अटक करतील, अशी विरोधी गटाला अपेक्षा होती. याच संधीचा फायदा घेत सभापतीपद मिळविण्यासाठी मोर्चेबांधणीही झाली होती. मात्र विरोधकांना कोणतीच संधी मिळाली नाही.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद