शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डांभेविरली येथे रोजगारसेवक पदासाठी झाली चक्क निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST

डांभेविरली येथील रोजगारसेवकाचे पद रिक्त असल्याने संबंधित पद भरण्याकरिता ८ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पात्र ८ उमेदवारांना गावातील ६६४ नागरिकांनी मतदान केले. या नागरिकांत ३५० पुरुष मतदारांचा समावेश होता, तर ३१४ महिला मतदारांचा समावेश होता. या निवडणुकीत हिरालाल बुराडे यांनी १७२ मते घेत विजय मिळविला असून त्यांची रोजगारसेकपदी निवड करण्यात आली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : गत वर्षभरापासून ग्रामपंचायत अंतर्गत रिक्त रोजगार सेवकाचे पद भरतीसाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका पदासाठी गावातील तब्बल ८ उमेदवारांनी अर्ज केल्याने ग्रामसभेच्या मागणीवरून प्रत्यक्ष मतदान पद्धतीचा अवलंब करीत निवडणूक घेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार लाखांदूर तालुक्यातील डांभेविरली येथील कार्यालयात ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. डांभेविरली ग्रामपंचायत अंतर्गत गत वर्षभरापूर्वीपासून रोजगार सेवकाचे पद रिक्त आहे. ग्रामसभेची नोटीस प्रसिद्ध करताना ग्रामपंचायत प्रशासन अंतर्गत रोजगारसेवक पदासाठी पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत ग्रामपंचायतीला रोजगारसेवक पदासाठी प्राप्त एकूण ९ उमेदवारांनी अर्ज आले हाेते. त्यापैकी भोजुराम बुराडेनामक उमेदवारांनी रोजगार सेवक पदासाठीचे अर्ज मागे घेतल्याने या पदासाठी ८ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले. पात्र उमेदवारांमधून रोजगारसेवक पदासाठी एका उमेदवाराच्या निवडीसबंधाने ग्रामसभा अध्यक्षांनी ग्रामसभेत चर्चा केली. यावेळी निवडीसाठी चिठ्ठीद्वारे मतदान प्रक्रिया घेऊन निवडणूक करण्याची मागणी केली. ग्रामसभेच्या मागणी अंतर्गत महिला व पुरुष असे दोन वेगवेगळे मतदान केंद्र निर्माण केले होते. निवडणूक प्रक्रियेत भरत राऊत, गणेश डिब्बे, अभय दोनाडकर, सोपान धोटे, रविकिरण गायकवाड, गोपीचंद शेंडे, हिरालाल बुराडे व दीपक रामटेके आदी उमेदवरांना गावकऱ्यांनी मतदान केले. 

हिरालाल बुराडे यांचा १७२ मतांनी विजय- डांभेविरली येथील रोजगारसेवकाचे पद रिक्त असल्याने संबंधित पद भरण्याकरिता ८ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत पात्र ८ उमेदवारांना गावातील ६६४ नागरिकांनी मतदान केले. या नागरिकांत ३५० पुरुष मतदारांचा समावेश होता, तर ३१४ महिला मतदारांचा समावेश होता. या निवडणुकीत हिरालाल बुराडे यांनी १७२ मते घेत विजय मिळविला असून त्यांची रोजगारसेकपदी निवड करण्यात आली आहे.

ग्रामसभेमध्ये केली गावकऱ्यांनी मागणी- ग्रामसभा अंतर्गत रोजगारसेवक निवडीसाठी एकापेक्षा अधिक अर्ज ग्रामपंचायतीला प्राप्त झाले होते. अर्जांचे ग्रामसभेत वाचन करून ग्रामसभेला उपस्थित नागरिकांना निवड प्रक्रिया सुचविण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांनी मतदान घेऊन निवडणूक प्रक्रियेची मागणी केल्याने १ रोजगारसेवक पदासाठी ८ उमेदवारांत निवडणूक घेण्यात आली.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतjobनोकरी