शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

ठाणा येथील पाणीप्रश्न पोहचणार न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:14 IST

ठाणा पेट्रोलपंप येथील नवीन पाणीपुरवठा योजनेवर ९६ टक्के रक्कम खर्च होऊनही १० वर्षापासून गावकऱ्यांना एक थेंब पाण्याचा मिळाला नाही. याप्रकरणी विविध स्तरावर चौकशी केली. पदरात अपयश पडले.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजनेचे प्रकरण : ग्रामसभेत जनहित याचिका मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : ठाणा पेट्रोलपंप येथील नवीन पाणीपुरवठा योजनेवर ९६ टक्के रक्कम खर्च होऊनही १० वर्षापासून गावकऱ्यांना एक थेंब पाण्याचा मिळाला नाही. याप्रकरणी विविध स्तरावर चौकशी केली. पदरात अपयश पडले. परिणामी ग्रामस्थांच्या अर्जानुसार विशेष ग्राम सभा बोलावून प्रशासन व अमंलबजावणी करणाऱ्या यंत्रणाविरुध्द जनहित यांची न्यायालयात दाखल करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.भारत निर्माण योजनेंतर्गत एक कोटी ४६ लक्ष किंमतीची नवीन ठाणा पाणीपुरवठाची महत्वाकांक्षी योजना मंजूर झाली. त्यानुसार सन २००१ च्या जनगणनेच्या आधारावर चार हजार लोकसंख्या नुसार गावात विस्तारित वितरण समस्येनुसार पाणीपुरवठा पाईप लाईन टाकण्यात आली. त्यानुसार गावनकाशा अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. हे काम दिड वर्षात पुर्ण अपेक्षीत होते. तीन कंत्राटदारानी गावातील पाणीपुरवठ्याचे कामे केली.मात्र गावाला एक थेंब पाणी मिळाले नाही. १० वर्षा दरम्यान ग्रामसभेत पाणी प्रश्नाबाबद गावकरी चर्चा घडवून आणीत होते. मात्र उडवा-उडवीचे उत्तरे मिळत होते. ग्रामपाणीपुरवठा समिती, ग्रामपंचायत व जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद एकमेकांवर दोषारोपण करीत होते. यात गावातील जनता पाण्यासाठी भरकटली जात होती. सामाजिक कार्यकर्ता अमित देशकर यांनी गावाअंतर्गत वितरण पाईप लाईनला नकाशाची मागणी माहितीच्या अधिकारांतर्गत मागितली होती. मात्र पाणीपुरवठा विभागाकडे योजनेची फाईलच नाही वा ग्रामपचांयत ठाणा मध्ये गावाचा वितरण पाईप लाईनचा नकाशाच नव्हता. प्रकरण राज्य माहिती अधिकारी कक्षाच्या दालनात नाना कारणामुळे प्रलंबित आहे. यावरुन कुठेतरी खेळ झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार शंका व्यक्त करण्यात येत आहे. विशेष ग्रामसभा ११ फेब्रुवारी रोजी झाली. सरपंच सुषमा पवार अध्यक्षस्थानी होते. यात जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडाराचे कार्यकारी अभियंता मोरेश्वर मैदमवार, उपविभागीय अभियंता प्रदिप सावरकर, वर्ग २ चे शाखा अभियंता हितेश खोब्रागडे उपस्थित होते. ग्रामसभेत पाणीपुवठ्याचा मुद्दा वादळी ठरला.सन २००७ पासुन सुरु झालेली ठाणा पाणीपुरवठा योजनेतील सन २०१२ पर्यंत सुमारे ९६ टक्के रक्कम खर्च झाले. या कामात दोष निर्माण झाले. स्थानिक पाणीपुरवठा समिती व कंत्राटदारामध्ये सकारात्मक निर्णयाचा अभावामुळे योजनेत त्रुट्या आहेत. यासंबध्ांी ठाणा योजनेची फाईल आम्हच्या कार्यालयात नाही. टाकलेले पीव्हीसी पाईप लाईनमध्ये दोष आहेत. ठिकठिकाणी लिकेज आहेत. होणाºया चौकशीला सामोरे जाण्याची तयार आम्हची आहे.-मोरेश्वर मैदमवार, कार्यकारी अभियंता,जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, भंडारा.