शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मंडळ सदस्यांनी आणले बनावट पत्र

By admin | Updated: September 2, 2014 23:30 IST

शाळेत लिपीक नसलेल्या व्यक्तीला लिपीक दाखवून त्याच्या चुकीमुळे संस्थेवर आर्थिक भुर्दंड पडला अशी बतावणी करून न्यायालयात दावा दाखल करणाऱ्या संस्थाध्यक्ष आणि शिक्षण मंडळ सदस्यांनी

तुमसर : शाळेत लिपीक नसलेल्या व्यक्तीला लिपीक दाखवून त्याच्या चुकीमुळे संस्थेवर आर्थिक भुर्दंड पडला अशी बतावणी करून न्यायालयात दावा दाखल करणाऱ्या संस्थाध्यक्ष आणि शिक्षण मंडळ सदस्यांनी पुरावा दाखल जोडलेले मंडळाचे पत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी न्यायालयाने हा दावा खारीज केला असून मुख्याध्यापक असलेले व शिक्षण मंडळ सदस्य राजकुमार बालपांडे यांनी परीक्षेची रक्कम व्याजासह भरावी असे आदेश आहेत. याप्रकरणी बालपांडे यांच्याविरुद्ध बोर्डाकडून कारवाई करण्याचे संकेत आहेत.पूजा शिक्षण संस्था तुमसर द्वारा संचालित शारदा विद्यालय तथा कन्या कनिष्ठ विद्यालय तुमसर येथे गोपी बडवाईक हे लिपीक पदावर नसतानाही त्यांना लिपीक असल्याचे दाखविण्यात आले. शाळेतील वर्ग १० च्या ४२ विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज व शुल्क बडवाईक यांनी वेळेच्या आत बोर्डाकडे सादर केले नाही. या आशयाचे संस्थेला परीक्षा शुल्क आणि दंड म्हणून ५७ हजार १२० रुपये मंडळाकडे भरावे लागेल असा आरोप करीत संस्थाध्यक्ष महावीर प्रसाद अग्रवाल यांनी बडवाईक यांच्याविरुद्ध प रीक्षा शुल्क अफरातफरीचा दावा दिवाणी न्यायालय तुमसर येथे दाखल केला होता. पुराव्यादाखल त्यांनी बोर्डात रक्कम भरल्याचे पत्रही न्यायालयात सादर केले होते. मात्र हे पत्र बोगस असल्याचे नंतर उघडकीला आले. शिक्षण मंडळ कार्यालयात संस्थेने रक्कम भरली नाही, मंडळाने असे कोणतेही पत्र दिले नाही. तसेच तशी नस्तीही मंडळ कार्यालयात नाही. अशी माहिती बोर्डाने दिल्यानंतर ही बनवाबनवी उघडकीला आली. परिणामी बडवाईक यांच्याविरुद्धचा दाखल केलेला दावा खारीज करण्यात आला. शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षण मंडळ सदस्य असलेल्या राजकुमार बालपांडे यांनी संगनमत करीत तसे बनावट पत्र असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणात गोपी बडवाईक यांना विनाकारण गोवण्यात आल्याचे त्यांचे धाकटे बंधू सचिन बडवाईक यांनी सांगितले. तसेच हा सगळा प्रकार माहितीच्या अधिकारान्वये कागदपत्रांच्या आधारे उघडकीला आली. शिक्षण मंडळ सदस्य बालपांडे यांचा हा कारभार चव्हाट्यावर आल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव यांच्य बनावट स्वाक्षरीचे खोटे पत्र सादर करून न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा मागणीची तक्रार सचिन बडवाईक यांनी शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे केली केली. त्यावर सुनावणी घेऊन शिक्षण संचालकांनी प्रकरण निकाली काढण्याचे आदेश शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना दिले होते. या प्रकरणात दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत मंडळाने निष्कर्ष नोंदविले होते. संस्थेने सादर केलेल्या पत्रावर मंडळाचा शिक्का नाही. बोर्डाला जमा केलेल्या रुपयांची नोंद बोर्डाच्या रोकड बुकमध्ये नाही. असेही न्यायालयाने नमुद केले आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही सचिन बडवाईक यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)