शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

दीड लाख रूपयांची बनावट विदेशी दारु जप्त

By admin | Updated: April 4, 2017 00:28 IST

बनावट विदेशी दारु बनवून ती विकणाऱ्या अड्यावर पोलिसांनी छापा घातला. या कारवाईत दीड लाखांच्या दारुसाठ्यासह दोघांना अटक केली.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दोन आरोपींना अटक, राष्ट्रीय महामार्गावरील दुकानांच्या बंदीनंतर अवैध विक्री वाढलीभंडारा : बनावट विदेशी दारु बनवून ती विकणाऱ्या अड्यावर पोलिसांनी छापा घातला. या कारवाईत दीड लाखांच्या दारुसाठ्यासह दोघांना अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भंडारा शहरातील लाल बहादूर शास्त्री वॉर्डात केली. रामना नरेश नगराळे (२८) रा. लाल बहादूर शास्त्री वॉर्ड व सौरभ राजु बोरकर (२३) रा. गांधी वॉर्ड छोटा बाजार भंडारा असे अटक करण्यात आलेल्या बनावट दारु विक्री करणाऱ्यांची नावे आहेत. भंडारा शहरातील लाल बहादूर शास्त्री वॉर्डातील शांताबाई नागदेवे यांच्या मालकीच्या घरी हे दोघे भाड्याने राहत होते. या दोघांनीही बेकायदेशिररित्या बनावट विदेशी दारु तयार करण्याच्या छोटा कारखाना सुरु केला. या ठिकाणावरुन त्यांनी तयार केलेली बनावट विदेशी दारु छुप्या मार्गाने बाजारात विक्रीला आणली होती. दरम्यान ही बाब गुप्तहेराकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांना मिळाली. या माहितीवरुन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारला लाल बहादूर शास्त्री वॉर्डातील शांताबाई नागदेवे यांच्या घरी छापा घातला. यावेळी बनावट विदेशी दारु बनविताना रामना नगराळे व सौरभ बोरकर यांना ताब्यात घेतले. दोघांविरुध्द भंडारा पोलिसात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोघांचीही कसून चौकशी सुरु असून त्यांनी यापूर्वी हा दारुसाठा कोठे विकला याबाबद अधिक माहिती घेण्यात येत आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, सहायक फौजदार प्रितीलाल रहांगडाले, पोलीस हवालदार वामन ठाकरे, पोलीस निरीक्षक रमेश चोपकर, पोलीस शिपाई चेतन पोटे, अनुप वालदे, चालक मनोज अंबादे यांनी केली. (शहर प्रतिनिधी)अशी बनवायचे बनावट दारुमध्यप्रदेशातून सिल्वर जेट दारु, अल्कोहोल लिक्वीड व साखरेला जाळून केलेला रंग यांचे मिश्रण तयार करण्यात येत होते. त्यात घरालगतच्या नाल्यातील गढूळ पाणी मिश्रीत करुन बनावट दारु तयार केली जात होती. मार्केटमधून इंग्रजी दारुचे खाली पव्वे खरेदी करुन त्यात ती बनावट दारु भरुन त्यावर मध्यप्रदेशातून आणलेले सिल लॉक लावून सिलबंद करुन ते दारुचे पव्वे बाजारात छुप्या मार्गाने विकण्यात येत होते. छाप्यात हे साहित्य केले जप्तया कारवाईत दोघांकडूनही व्हिस्की, बनावट दारुने भरलेल्या सीलपॅक ७२ दारुच्या बॉटल, एका पांढऱ्या रंगाच्या पाच लिटरच्या प्लॅस्टीक कॅनमध्ये पाच लिटर बनावटी दारुचे मिश्रण, एका प्लॅस्टीक कॅनमध्ये तीन लिटर अल्कोहोल लिक्वीड, या इंग्रजी दारुचे शिशीला लावण्यात आलेले वेगवेगळ्या व्हीस्कीचे ५३० झाकण, झाकणावरील १२४ सील कव्हर, ४५० नग झाकणावरील सील कव्हर, २४९ सील कव्हर, २३० नग झाकण, ८८ नग झाकण, प्लॉस्टीक बॉटलमध्ये बनावटी दारुमध्ये रंग येण्याकरिता साखरेला जाळून तयार केलेला गडद लाल रंग, अन्य विदेशी कंपण्यांची झाकणे असा १ लाख ५१ हजार रुपयांचा साहित्य साठा जप्त केला.