तलमलेविरुद्ध गुन्हे दाखल : प्रकरण दडपण्यासाठी राजकीय दबावपवनी : पारपत्र बनविण्यासाठी तहसील कार्यालयातून विलंब होत असल्याचा कारणावरुन भाजपचे पवनी शहर अध्यक्ष हरिश तलमले यांनी कार्यालयात धिंगाणा घातला. त्यानंतर महत्वाचे दस्तावेज फेकून शिवीगाळ करुन जीवे मागण्याची धमकी दिल्याची तक्रार तहसीलदार नरेंद्र राचेलवार व लिपीक राघोर्ते यांनी पवनी पोलिसात दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तलमलेविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.हरीष तलमले रा. बेलगाटा वार्ड पवनी यांनी स्वत:सह पत्नी व मुलाचा पासपोर्ट मिळण्याकरिता नमुना एफमध्ये प्रमाणपत्र देण्याबाबत तालुका न्याय दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केला. त्यासाठी आज शनिवारला दुपारी ११.४५ वाजता तलमले यांनी संबंधित लिपीक एस. आर. राघोर्ते यांना जाणीवपूर्वक प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप करुन तहसीलदार व लिपीकाला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान तहसीलदारांनी तलमले यांचा पोलिसांकडून मागविलेल्या अहवालात गुन्हा नोंद असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पत्नीच्या पासपोर्टच्या नमुना एफचे प्रमाणपत्र मिळावे, अशी मागणी केली. पंरतु तहसीलदार कोतवाल भरती व इतर शासकीय कामात व्यस्त असल्यामुळे त्यांनी तलमले यांच्या पत्नीविरुद्ध पवनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद नसला तरी त्यांच्या माहेरच्या गावातून पोलीस अहवाल मागवावे, लागेल असे सांगितले. पासपोर्टकरीता नमुना एफ देणे बंधनकारक नाही, असे म्हणताच तलमले यांनी तहसीलदार राचेलवार यांच्याशी एकेरी भाषेत बोलून पाहून घेईल, अशी धमकी दिली. त्यामुळे तहसीलदारांच्या तक्रारीवरुन पवनी पोलिसांनी तलमलेविरुद्ध भादंवि ३५३, ५०४ व ५०६ कलमान्वये गुन्हे दाखल केले. याप्रकरणी आमदार रामचंद्र अवसरे यांनी तहसीलदारांच्या कक्षात जावून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. (तालुका प्रतिनिधी)मारहाण केली नाहीपारपत्रासाठी १६ एप्रिलला अर्ज दिला. त्यानंतर २२ एप्रिल रोजी पोलिसांचा अहवाल मिळाल्यानंतर तहसील कार्यालयात स्वत: नेऊन दिला. त्यावर तहसीलदारांनी गुन्हे दाखल असल्याचे सांगितले. त्यामुळे माझे नमुना एफ देऊ नका परंतु, पत्नीच्या पारपत्रासाठी कागदपत्राची पुर्तता करा, अशी विनंती केली. परंतु तहसीलदार राचेलवार यांची रेती तस्करी प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी मारहाण केली नसतानाही जाणीवपूर्वक मला गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत.- हरीष तलमले, शहर अध्यक्ष भाजप पवनी.
तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी
By admin | Updated: May 3, 2015 00:47 IST