शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

दहावीत वैष्णवी व प्रतीक्षा अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 01:03 IST

दहावीच्या परीक्षेत येथील जेसीस कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी वैष्णवी विजय हिंगे आणि प्राईड कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी प्रतीक्षा प्रमोद बेदपुरिया समान ९५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आल्या आहेत. जिल्ह्याचा निकाल ६५.९८ टक्के लागला असून गतवर्षीपेक्षा २०.६५ टक्क्यांनी निकाल घटला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ६५.९९ टक्के । गतवर्षीपेक्षा २०.६५ टक्क्यांनी घटला निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दहावीच्या परीक्षेत येथील जेसीस कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी वैष्णवी विजय हिंगे आणि प्राईड कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी प्रतीक्षा प्रमोद बेदपुरिया समान ९५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आल्या आहेत. जिल्ह्याचा निकाल ६५.९८ टक्के लागला असून गतवर्षीपेक्षा २०.६५ टक्क्यांनी निकाल घटला आहे.भंडारा जिल्ह्यातून यंदा दहावीच्या परीक्षेला २८३ शाळांचे १७ हजार ५९० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ११ हजार ६०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १६७६ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर ५०५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागात भंडारा जिल्हा तिसऱ्या स्थानी राहिला. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून जिल्ह्यातील ७४.५६ टक्के मुली उत्तीर्ण झाल्यात. जिल्ह्यातून ८ हजार ५५९ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी ६ हजार ३८२ मुली उत्तीर्ण झाल्या. तर ९ हजार ३१ मुलांपैकी ५ हजार २२५ मुले उत्तीर्ण झाले. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५७.८६ टक्के आहे.भंडाराच्या जेसीस स्कुलची विद्यार्थिनी वैष्णवी विजय हिंगे ही दहावीच्या परीक्षेत ५०० पैकी ४७५ म्हणजे ९५ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. वरठी येथील राहणाºया वैष्णवीचे वडील रेल्वेत कार्यरत होते. दोन वर्षापूर्वीच त्यांचे निधन झाले. वडीलांच्या निधनानंतर आईने वैष्णवी व तिच्या बहिणीला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. वैष्णवीला एनडीए मध्ये जायचे आहे. जेसीस स्कुलच्या मुख्याध्यापिका रंजना दारवटकर, संस्थाचालक मुकेश पटेल, मोहन निर्वाण, कल्याण भलगट, महेश पांडे आदींनी तिचा शाळेत सत्कार केला. तर प्राईड कॉन्व्हेंटची प्रतीक्षा प्रमोद बेदपुरिया ही सुद्धा ५०० पैकी ४७५ गुण घेऊन उत्तीर्ण झाली. प्रतीक्षाचे वडील मोहाडी तालुक्यातील सालेबर्डी येथे जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहेत तर आई गृहिणी आहेत. नियमित आठ तास अभ्यास करणाऱ्या प्रतीक्षाला डॉक्टर व्हायचे आहे.गतवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्याचा निकाल २०.६५ टक्क्यांनी घटला आहे. गतवर्षी भंडारा जिल्ह्याचा निकाल ८६.६४ टक्के लागला होता.सहा शाळा १०० टक्केभंडारा जिल्ह्यातील २८३ शाळांचे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी सहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात जवाहरनगर येथील आॅर्डीनन्स फॅक्टरी सेकंडरी स्कुल, तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथील सावित्रीबाई मेमोरियल विद्यालय, साकोली येथील कृष्णमुरारी कटकवार इंग्लीश हायस्कुल, पवनी येथील पवन पब्लिक स्कुल, लाखनी तालुक्यातील गडेगाव येथील हायसिंथ लिटल फ्लावर स्कुल आणि लाखांदूर येथील विद्या विहार मंदिरचा समावेश आहे. तर लाखनी तालुक्याचा निकाल ७२.५७, भंडारा ७१.३७, साकोली ६९.१६, पवनी ६४.११, लाखांदूर ६२.३८, तुमसर ६०.९५, मोहाडी ५९.७१ टक्के आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल