शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा; वडिलांच्या पार्थिवाजवळ बसून केला रात्रभर अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 14:56 IST

अभ्यास कर, शिक्षण घेत पुढे जा, स्वत:च्या पायावर उभी रहा, असा कानमंत्र देणाऱ्या वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी दहावीचा पेपर. घरात त्यांचे पार्थिव. अशा शोकाकूल वातावरणात त्यांंच्या पार्थिवाजवळ बसून रात्रभर अभ्यास केला.

ठळक मुद्देपेपर सोडविल्यानंतर लेकीने दिला अखेरचा निरोप

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अभ्यास कर, शिक्षण घेत पुढे जा, स्वत:च्या पायावर उभी रहा, असा कानमंत्र देणाऱ्या वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी दहावीचा पेपर. घरात त्यांचे पार्थिव. अशा शोकाकूल वातावरणात त्यांंच्या पार्थिवाजवळ बसून रात्रभर अभ्यास केला. वडिलांच्या मृत्यूचे दु:ख हृदयात ठेवत दुसऱ्या दिवशी दहावीचा पेपर दिला. पेपर सोडविल्यानंतर तिने आपल्या लाडक्या पित्याला अखेरचा निरोप दिला. ही घटना आहे लाखांदूर तालुक्याच्या खैरी (पट) येथील.प्रणाली खेमराज मेश्राम ही लाखांदूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाची दहावीची विद्यार्थिनी. वर्षभर दहावीचा अभ्यास केला. एस.टी. महामंडळात चालक असलेले वडील खेमराज मेश्राम मुलीला अभ्यासासाठी प्रोत्साहित करायचे. अभ्यास कर, स्वत:च्या पायावर उभी राहा असे ते नेहमी मुलीला सांगायचे. वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी प्रणाली ही मेहनतीने अभ्यास करू लागली. अचानक खेमराज यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. ब्रम्हपुरी, नागपूर येथे उपचार सुरु होते. त्यांना कर्करोग झाल्याचे माहित होताच प्रणालीसह संपूर्ण कुटूंब धास्तावले. अशाही परिस्थितीत तिने दहावीचा अभ्यास सुरुच ठेवला. अशातच सोमवार ४ मार्च रोजी रात्री ८ वाजता खेमराजवर काळाने झडप घातली. त्यांचे निधन झाले. खैरी पट येथील घरी पार्थिव आणण्यात आले. प्रणालीचा दुसऱ्या दिवशी दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. वडिलांच्या निधनाने दु:खाचा डोंगर कोसळला. सदैव धीर देणारे वडीलच अचानक सोडून गेल्याने प्रणाली कोलमडून पडली.खेमराज मेश्राम यांच्या निधनाची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.के. खोब्रागडे, आर.एम. मुळे, शिक्षक संजय प्रधान, एस.डब्लू. दिवटे प्रणालीच्या घरी पोहचले. प्रणालीला त्यांनी धीर दिला. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहावीचा पेपर देण्याचा सल्ला दिला. प्रणालीने जड अंतकरणाने हा सल्ला मानत रात्रभर त्यांंच्या पार्थिवाजवळ बसून अभ्यास केला. मंगळवारी सकाळी मृत्यूचे दु:ख हृदयात ठेवून दहावीच्या परीक्षेला गेली. इंग्रजीचा पेपर सोडवून गावी परत आली. त्यानंतर आपल्या लाडक्या वडिलांना तिने आणि गावकऱ्यांनी अखेरचा निरोप दिला. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण उच्च शिक्षण घेणार असे तिने डबडबत्या डोळ्यांनी सांगितले तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यालाही अश्रूधारा लागल्या होत्या.

टॅग्स :examपरीक्षा