शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
4
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
5
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
6
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
7
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
8
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
9
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
10
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
11
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
12
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
13
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
14
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
15
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
16
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
17
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
18
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
19
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
20
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर

कमी दराची निविदा खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:51 IST

१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भंडारा नगरपरिषदेला घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोट्यवधीचा निधी देण्यात आला. या निधीतून डंम्पिग यार्डमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा काढण्यात आली.

ठळक मुद्देप्रकरण डंम्पिग यार्डचे : कारभार भंडारा नगर परिषदेचा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भंडारा नगरपरिषदेला घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोट्यवधीचा निधी देण्यात आला. या निधीतून डंम्पिग यार्डमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा काढण्यात आली. परंतु कमी दराची निविदा खारीज करून अधिक दराच्या निविदा धारकाला काम देण्यात आल्याचा आरोप अरूण लांजेवार या निविदाधारकाने पत्रपरिषदेत केला.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत भंडारा शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी डम्पींग यॉर्ड परिसरात कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम तीन कोटी ७५ लाख ९३ हजार २३२ रूपयांचे होते. हे काम मिळावे यासाठी लांजेवार यांनी निविदा टाकली होती. यांची निविदा कामाच्या रक्कमेच्या अडीचपट कमी दराची होती. मात्र ही निविदा उघडण्यातच आली नाही. उलट आताशा आर्शिवाद बिल्डर नागपूर यांची ९.४० टक्के अधिक दराने असतांनाही ही निविदा मंजूर करण्यात आली. निविदा रद्द का करण्यात आली असे त्यांनी विचारले असता बांधकाम कंपनीचे वर्ग २ ची नोंदणी नसल्याचे कारण नगर परिषद प्रशासनाने लांजेवार यांना सांगितले.वास्तविक पाहता कोणत्याही कामाची निविदा ही कमी दराची असल्यास त्यांना काम दिले जावे असे परिपत्रकात नमूद असतांनाही पालिकेने आमची कमी दराची निविदा नाकारुन अधिक दराच्या निविदा धारकाला काम दिल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाविरोधात आम्ही ३०८ अन्वये जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.प्रकरण न्याय प्रविष्ठ असतांना नगर पालिकेने नागपूरच्या कंपनीला वर्क आॅर्डर दिला आहे. ही कंपनी नागपूरची असली तरी या कामावर नगराध्यक्षांच्या बांधकाम कंपनीची वाहने कार्यरत असून हे काम थांबविण्यात यावे अशी मागणीही लांजेवार यांनी केली आहे.