शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षापासून शासकीय इमारत धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:46 IST

तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील लाखनी शहराचे उपशहर असलेल्या मुरमाडी (सावरी) येथे दहा वर्षापूर्वी शासकीय इमारत आमदार निधीतून तयार करण्यात आली. सदर इमारतीचा उपयोग होत नसल्याने अवैध कामाचा केंद्र बनले आहे.

ठळक मुद्देमुरमाडी ग्रामपंचायतचे दुर्लक्ष : इमारतीत असामाजिक तत्त्वांचा वावर

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील लाखनी शहराचे उपशहर असलेल्या मुरमाडी (सावरी) येथे दहा वर्षापूर्वी शासकीय इमारत आमदार निधीतून तयार करण्यात आली. सदर इमारतीचा उपयोग होत नसल्याने अवैध कामाचा केंद्र बनले आहे.मुरमाडी (सावरी) ग्रामपंचायतच्या क्षेत्रात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील लाखनीचे नावाने असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या परिसरात शासकीय इमारत तयार करण्यात आली आहे. त्या इमारतीमध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्या शासकीय इमारती समोरील जागेसाठी वाद सुरु होते. सदर वाद संपुष्टात असल्याची चर्चा आहे. इमारतीचे मालकी हक्क सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायत मुरमाडीकडे सोपविले आहे.माजी आमदार सेवक वाघाये यांच्या निधीतून तयार झालेल्या इमारतीसाठी १० ते १२ वर्षापूर्वी ७ ते ८ लक्ष रुपये खर्च करण्यात आले. सदर इमारतीवरुन राजकीय वाद निर्माण झाले होते. वाद संपुष्टात आला. इमारत तयार करण्यात आली. परंतु सदर इमारत पडीत अवस्थेत आहे. या इमारतीमध्ये ग्रामपंचायतचे कामकाज चालविण्यात येणार होते. परंतु मागील तीन वर्षापूर्वी नवीन ग्रामपंचायत भवन तयार करण्यात आले. इमारतीचा वापर होत नसल्याने इमारत खराब होत आहे. इमारतीच्या परिसरात दारुच्या बाटल्या पडलेल्या आहेत. इमारतीसमोर असलेले छोटे व्यवसायीक कचरा इमारत परिसरात टाकतात.सदर इमारतीचा वापर अवैध कामासाठी केला जात आहे. अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयाला जागा हवी आहे. त्या इमारतीचा उपयोग शासकीय कार्यालयासाठी केला जाऊ शकतो.मुरमाडी ग्रामपंचायत या सभागृहाचा वापर कार्यक्रमासाठी करू शकते किंवा शासकीय उपक्रमासाठी इमारतीचा वापर केला जाऊ शकतो. शासकीय निधीचा उपयोग करून इमारत उभी करण्यात आली आहे. त्या इमारतीचा वापर जनतेसाठी होणे आवश्यक आहे. अन्यथा इमारत उपयोगाविना निकृष्ट होईल.सदर इमारत दुरुस्त करून शासकीय कामकाजासाठी देण्यात येईल. त्यामुळे ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.-सुनिता भालेराव,सरपंच, मुरमाडी (लाखनी)

टॅग्स :Governmentसरकार