शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण मोबाईल अ‍ॅपचे दहा लक्ष ग्राहक

By admin | Updated: February 18, 2017 00:17 IST

राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाईन सेवा मिळावी यासाठी वीज ग्राहक व कर्मचाऱ्यांकरिता महावितरणच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅप्सला चांगला प्रतिसाद मिळत असून ...

भंडारा : राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाईन सेवा मिळावी यासाठी वीज ग्राहक व कर्मचाऱ्यांकरिता महावितरणच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅप्सला चांगला प्रतिसाद मिळत असून केवळ सात महिन्यात सुमारे १० लाख ग्राहकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपद्वारे आतापर्यंत १ कोटी ७० लाख ग्राहकांचे मीटर रीडींग घेण्यात आले आहे. तसेच ७ लाख ४३ हजार ग्राहकांनी आपल्या वीज बिलांचा भरणा करण्यासाठी या अ‍ॅपचा वापर केला असून सुमारे ४५ हजार ८१३ ग्राहकांना अ‍ॅपद्वारे नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.या अ‍ॅपद्वारे नवीन ग्राहकांना वीजजोडणी अर्ज, वीजबिलांची माहिती व बिलांचा भरणा वीजसेवाविषयी तक्रारी व अभिप्राय इत्यादी सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय ज्या ग्राहकांचे मीटर रिडींग घेण्यात आले नाही त्यांना अ‍ॅपद्वारे रिडींग पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हे अ‍ॅप महावितरण वेबसाईट, गुगल प्ले, अ‍ॅपल, विंडोज स्टोअर्स येथे उपलब्ध आहे.राज्यातील सुमारे ३८ हजारांपेक्षा अधिक तांत्रिक कर्मचाऱ्यांनी कर्मचारी मित्र अ‍ॅप डाऊनलोड केले असून याद्वारे नवीन वीजजोडणी, खंडित वीजपुरवठ्याबाबत एसएमएस, अचुक वीजमिटर रिडींग, फिडर व डीटीसी मीटर रिडींग इत्यादी दैनंदिन कामे प्रभावीपणे केली जात आहेत. त्यामुळे महावितरणच्या कामकाजात अधिक गती आली आहे.महावितरणच्या सुमारे १ कोटी ४ लाख ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली असून या ग्राहकांना मीटर रिडींग वीजबिल, आॅनलाईन बिल, नवीन वीजोडणीसाठी अर्ज व त्यांची सद्यास्थिती, मोटार वाचन घेतल्याचा आणि देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे इत्यादीबाबतच्या सूचना महावितरणतर्फे एसएम्एसद्वारे पाठविण्यात येते. (नगर प्रतिनिधी)