शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींसाठी काय केले, ते सांगा! राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला खडा सवाल

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: April 14, 2024 06:11 IST

राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला खडा सवाल; महाराष्ट्रातील प्रचाराचा विदर्भातून केला शुभारंभ

गाेपालकृष्ण मांडवकर, लोकमत न्यूज नेटवर्क साकाेली (भंंडारा): पंतप्रधान नरेंद्र माेदी स्वत:ला ओबीसी म्हणवतात, पण त्यांच्या सरकारने ओबीसींची जातगणना केली नाही. दलित, आदिवासी, शेतकरी, महिला व युवकांचे  प्रश्न साेडविले नाहीत. धाेरण निश्चित करण्याच्या प्रक्रियेत या वर्गाला भूमिकाच नाही, माेदींनी या वर्गासाठी काय केले हे सांगावे, असे आव्हान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी येथे दिले. आमचे सरकार आल्यास देशात जातीनिहाय जनगणना केली जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अग्निवीर योजना रद्द केली जाईल, याचा राहुल यांनी पुनरुच्चार केला. 

भंडारा-गाेंदिया मतदारसंघातील साकाेली येथे महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचार सभेत बोलताना राहुल म्हणाले, भारत जाेडाे न्याय यात्रेदरम्यान आपण देशभर फिरलाे. यावेळी शेतकरी, युवक, महिला यांच्यासह समाजाच्या सर्वच घटकांसाेबत चर्चा केली, त्यांच्या मनातील भावना, प्रश्न समजून घेतले. त्यातूनच हा जाहीरनामा तयार झालेला आहे. तो काँग्रेसचा नव्हे, तर जनतेचा जाहीरनामा असून, यामध्ये दिलेल्या पाच गॅरंटी आम्ही नक्कीच पूर्ण करू, अशी ग्वाही राहुल यांनी दिली.

तत्काळ ३० लाख नाेकरभरती, पेपर फुटणार नाहीतदेशात सध्या ३० लाख जागा रिक्त आहेत. मात्र सरकारने त्या भरल्या नाहीत. आमचे सरकार आल्यास नाेकरभरती केली जाईल व पेपर फुटणार नाहीत. ही भरती खासगी कंपनी नव्हे, तर सरकारी यंत्रणेद्वारे केली जाईल, तसेच डिप्लाेमा, पदवी धारकांना एक वर्षाची ॲप्रेंटिसची गॅरंटी देत आहोत, असे ते म्हणाले.

हरित, श्वेत क्रांती केलीकाॅंग्रेसने या देशात हरितक्रांती, श्वेतक्रांती केली. मात्र मोदी सतत धर्मावर बोलतात. कधी समुद्राच्या तळाशी दिसतात. तिथे पुजारी नाही पण आर्मी जवानांसाेबत पूजा करतात. देशाच्या प्रश्नांवर त्यांना बाेलायला वेळ नाही, अशी टीका राहुल यांनी केली.

जीएसटीत सुधारणा, महिलांना १ लाख- जीएसटी करप्रणालीतील जाचक अटींचा सामान्यांना फटका बसला आहे. त्यामुळे आम्ही त्यात सुधारणा करू. साेबतच गरीब महिलांच्या खात्यात दरमहा ८,५०० रुपये टाकले जातील.- हे बक्षीस नाही, तर देशाची पिढी  घडविणाऱ्या मातेचा सन्मान असल्याचे राहुल म्हणाले. गेल्या दहा वर्षांत देशात अदानी सरकार सुरू आहे.- प्रत्येक कंपनी, विमानतळ, बंदर, खाण, पायाभूत उद्याेग, साैरऊर्जा असे सर्वच उद्याेग अदानींकडे कसे येतील, हेच लक्ष्य सरकारने ठेवल्याचा आराेप त्यांनी केला.

टॅग्स :bhandara-acभंडाराcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी