शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

रेल्वेच्या ओव्हरब्रिज बांधकामाने सांगा, आता जगायचे कसे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

अनेक दुकानदारांच्या दोन पिढ्या या रस्त्यावर असलेल्या दुकानांच्या भरवशावर निघाल्या. अचानक अतिक्रमण काढायचे आदेश आल्याने त्यांच्यासमोर संकट निर्माण झाले आहे. दुकाने बंद झाली तर मुलंबाळ कशी पोसायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करूनच कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : शासकीय यंत्रणा केव्हा कुणाची वाट लावेल याचा नेम नाही. याचा प्रत्यय वरठीवासीयांना आला आहे. रस्त्याच्या कडेला उभे आयुष्य काढणाऱ्यांना एका झटक्यात जागा रिकामी करण्याचे फर्मान आले. जागा रिकामी होईल; पण आता जगायचे कसे, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत. तूर्तास उपाय सापडत नसल्याने अनेकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असून, त्यांची धडधड वाढली आहे. भंडारा रेल्वे फाटक परिसरात जुना राज्य महामार्ग आहे. गावाच्या बाहेर मुख्य महामार्ग तयार झाल्याने तो रस्ता निरुपयोगी होता. रस्त्यावर वाढलेले रहदारी व ओव्हर ब्रिजचे काम सुरू करायचे असल्याने गावांतर्गत असलेला महामार्ग अचानक प्रकाशझोतात आला. ओव्हर ब्रिज कामानिमित्त महिनाभर बंद राहील. यामुळे त्या रस्त्यावरील वाहतूक गाववांतर्गत महामार्गावरून वळविण्यात येणार आहे. जवळपास दोन दशकापासून हा रस्ता दुर्लक्षित होता.  यामुळे नागरिकांनी उदरनिर्वाहासाठी दुकाने थाटली. जवळपास २५ ते ३० कुटुंबांचा उदरनिर्वाह या दुकानांवर अवलंबून आहे. अनेक दुकानदारांच्या दोन पिढ्या या रस्त्यावर असलेल्या दुकानांच्या भरवशावर निघाल्या. अचानक अतिक्रमण काढायचे आदेश आल्याने त्यांच्यासमोर संकट निर्माण झाले आहे. दुकाने बंद झाली तर मुलंबाळ कशी पोसायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था करूनच कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पर्यायी व्यवस्था करण्यासाठी चाचपणीगावातील नागरिकांचे नुकसान होऊ नये, अशी भूमिका सरपंच श्वेता येळणे व माजी सरपंच संजय मिरासे यांनी बैठकीत मांडली. दुकानासमोर असलेले टीन शेड काढण्याच्या सूचना अतिक्रमणधारकांनी मंजूर केली असून, यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. यांची पर्यायी व्यवस्था कुठे करायची, याबाबत चाचपणी सुरू आहे; पण तूर्तास हा प्रश्न सुटण्याची शक्यता नाही.

अनेकांना बसला फटका  - या भागात शुभांगी गणवीर यांचे दुकान आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेत त्यांच्या पतीचे निधन झाले. कुटुंबातील कमावता पुरुष गेल्याने त्यांचे सर्व आर्थिक स्रोत बंद झाले. मुले शिकत आहेत. दुकाने पडल्यास उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न आहे.  काही दुकानदार कुटुंबासह त्या भागात राहतात. घरे पडली तर कुटुंबे उघड्यावर येणार असल्याने त्यांच्यासमोर समस्या निर्माण झाली आहे.पोलिसांची तत्परता हुकूमशहासारखी - अतिक्रमण काढण्यावरून दुकानदारांत रोष आहे.  मोजणीला आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी अतिक्रमणाबाबत विचारले; पण समाधान न झाल्याने त्यांनी समाधान करण्याची मागणी केली. याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार करताच पोलिसांचा ताफा काही वेळात दाखल झाला. माहिती घेणे अतिक्रमणधारकांचा अधिकार आहे; पण समाधान न करता जिल्हा प्रशासन दडपशाही करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ऐनवेळी आमदार राजू कारेमोरे यांनी मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला. एरवी वारंवार फोन करून न पोहोचणारी पोलीस यंत्रणा एका झटक्यात आल्याने इंग्रज राजवटीची आठवण झाली.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणrailwayरेल्वे