शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

साहेब सांगा, आता आम्ही पोट भरायचे कसे? भंडारा परिसरातील परिस्थिती विदारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 13:50 IST

Bhandara News, Rain, Agriculture भंडारा परिसरात मुसळधार पावसामुळे शेतातील उभे पीक मातीमोल झाले आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने केला शेतकऱ्यांचा घात पंचनामे करून पीक विमा त्वरित देण्याची मागणी

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने अडयाळ व परिसरातील शेतकऱ्यांचे टेंशन वाढले आहे. शेतकरी शेतातील परिस्थिती पाहून आपली आपबिती सांगत आहेत. शेतकऱ्यांना आतापर्यंत अनेक समस्यांना तोंड देता देता नाकी नऊ आले पण आलेल्या अवकाळी पावसामुळे मात्र आता पूर्ण कंबरडे मोडले आहे आता पोट भरायचे कसे नी कर्ज फेडायचे कसे?, असा प्रश्न बळीराजा विचारीत आहे.

अडयाळ व परिसरात पेरणीपासून ते आतापर्यंत शेतकऱ्यांनी अनेक संकटाचा सामना केला. त्यात घडाईपेक्षा मडाई झाली तरी शेतकरी घाबरून गेला नाही, आणि हिम्मत सुध्दा सोडली नाही पण आता परतीच्या मुसळधार पावसामुळे मात्र शेतातील उभे पीक मातीमोल झाले आहे. शेवटी शेतकऱ्यांसमोर निसर्गाच्या प्रकोपासमोर काहीही कुणाचेही चालत नाही. गत आठवड्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे अडयाळ व परिसरात ह्यकुठे खुशी तर कुठे गमह्ण पाहायला मिळत आहे. शेतातील धान आलेल्या पावसामुळे व सोसाट्याचा वाऱ्यामुळे धानपीक जमीनदोस्त झाले. यावर उपाय म्हणून बरेच शेतकरी गुरुवारी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेतातील पाणी काढण्यात तर काही ठिकाणी शेतकरी शेतात कापणी केलेले धान्य उचलताना दिसून येत आहे. अचानकपणे आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र अडयाळ व परिसरात पाहायला मिळते आहे.

खर्च झालेला खर्च तरी आता हातात येण्याची शक्यता कमी आहे, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे खर्च भागवणे म्हणजे आता शेतकऱ्यांना जर दिलासा मिळाला तर ठीक आहे. नाहीं तर मग कर्ज भरायची कशी असा प्रश्न आहे. अडयाळ व परिसरात प्रथमत: अळी ने घात केला नंतर पावसाने. पुन्हा धानावर तुडतुडा, करपा रोगाने शेतकरी चिंताजनक स्थितीत असतानाच आता पुन्हा हा अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी आता मोठ्या चिंताजनक स्थितीत सापडला आहे. यावर आता पुढे अजून काय होईल याची सुद्धा चिंता असल्याने शेतकरी आज निराशेच्या छायेत आहे. यावर आता काय उपाययोजना आखली जाते याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याचा लाभ मिळावा अशी मागणी अभय शृंगारपवार, देवेंद्र हजारे, शिवशंकर मुंगाटे, युवराज वासनिक, मधू गभने, देविदास नगरे, प्रकाश मानापुरे, मोहन कावळे, राजेंद्र ब्राह्मणकर, सुरेंद्र आयतूलवार व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.याकडे आता लोकप्रतिनिधीनी सुद्धा तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. वर्तमान परिस्थितीत शेतकरी शेतातील पाणी जमेल तेवढी श्रम घेऊन काढण्यात व्यस्त दिसत आहे.

 

टॅग्स :agricultureशेती