शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या लढ्यात तेली समाजाची उडी

By admin | Updated: August 9, 2014 23:33 IST

मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलन छेडले असतानाच आता तेली समाजानेही त्यात उडी घेऊन ८ टक्के आरक्षणाची मागणी लावून धरली आहे.

लाखनी : मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलन छेडले असतानाच आता तेली समाजानेही त्यात उडी घेऊन ८ टक्के आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. ही मागणी पूर्ण झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे.राज्य शासनाने मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण जाहीर केले. त्यामुळे धनगर समाजाने मोर्चा, उपोषण, रस्ता रोको व बेमुदत उपोषणाच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाला आदिवासी समाजाने विरोध केला आहे. धनगर व आदिवासींमधील संघर्ष पेटला असतानाच तेली समाजानेही ८ टक्के आरक्षणाची मागणी केली आहे. ३६२ जातींचा समावेश असलेल्या ओबीसी प्रवर्गासाठी राज्यात २७ टक्के आरक्षण असून यात अनेक जातींना न्याय मिळत नाही. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी २७ टक्के लोकसंख्या तेली समाजाची असल्याने तेली समाजाला ८ टक्के आरक्षण मिळणे आवश्यक आहे. अलिकडे आरक्षणावर अनेकांचा डोळा आहे. आरक्षण हे मागासवर्गीय व अविकसित जातीकरीता लागू करण्यात येते. ज्या घटकांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास झाला नाही अशांना समाजाच्या प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण देण्याची तरतूद आहे. परंतु मतांचे राजकारण करीत असलेल्या राज्यकर्त्यांनी आरक्षणाचा बाजार मांडला आहे. वर्षानुवर्षपासून सत्तेत राहून आर्थिक, सामाजिक, व शैक्षणिकदृष्ट्या प्रगत झालेल्या समाजाला केवळ बेरजेच्या राजकारणासाठी म्हणून आरक्षण दिले जात आहे. त्यामुळे भविष्यात मागास घटकांसमोर अंधकारमय परिस्थिती निर्माण होणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला १५ टक्के आरक्षण दिले आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी तेली समाजाची संख्या २७ टक्के आहे. बोटावर मोजण्याइतके आमदार तेली समाजाचे निवडून आले आहे. यामुळे तेली समाजाला अपेक्षित विकास साधता आला नाही. या समाजाचा जीवनस्तर खालावला आहे. शेती, मजुरी, केवळ पोट भरता येईल असा छोटासा व्यवसाय यापुरता तेली समाज मर्यादित राहिला आहे. ओबीसी प्रवर्गात ३६२ जाती आहेत. तेली समाजाला लोकसंख्येच्या तुलनेत ८ टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे. तेली समाजाला पुरेसे आरक्षण देण्याची मागणी तेली समाज संघटनेने केली आहे. (तालुका प्रतिनिधी)