शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविते ‘तेजस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:52 IST

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे आणि शिक्षकांना शैक्षणिक विकासाची संधी उपलब्ध करून देणारा तेजस प्रकल्प साकोली तालुक्यात प्रभाविपणे राबविला जात आहे. महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि ब्रिटीश कॉन्सीलच्या माध्यमातून राबविल्या जाणाº या या प्रकल्पातून साकोली तालुक्यातील विद्यार्थी तेजोमय होणार आहेत.

ठळक मुद्देसाकोली तालुका : महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि ब्रिटीश कौन्सीलचा उपक्रम

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे आणि शिक्षकांना शैक्षणिक विकासाची संधी उपलब्ध करून देणारा तेजस प्रकल्प साकोली तालुक्यात प्रभाविपणे राबविला जात आहे. महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि ब्रिटीश कॉन्सीलच्या माध्यमातून राबविल्या जाणाº या या प्रकल्पातून साकोली तालुक्यातील विद्यार्थी तेजोमय होणार आहेत.गतवर्षी राज्यातील नऊ जिल्ह्यात तेजस प्रकल्प प्रायोगीक तत्वावर राबविण्यात आला. या प्रकल्पाचे यश लक्षात घेऊन २७ जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबविल्या जात आहे. शिक्षकांना विद्या प्राधीकरण औरंगाबादच्या माध्यमातून टॅग समन्वयक पदासाठी लिंक भरून घेण्यात आली. उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाºया शैक्षणिक परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. असा हा महत्वपूर्ण तेजस प्रकल्प साकोली तालुक्यात राबविला जात आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरु आहे. जिल्ह्यातील ११ टॅग समन्वयक प्रशिक्षित होऊन आले असून जिल्ह्यातील ३३ केंद्रातील शिक्षकांना विविध तंत्रज्ञान देत इंग्रजी विषयाची व्याप्ती वाढविण्याचे काम सुरु झाले आहे. डायरेक्ट भंडारा येथे कार्यरत जनबंधू, परिहार यांच्या नियोजनातून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.आतापर्यंत साकोली तालुक्यात राम चाचेरे (झाडगाव), प्रकाश पाटील (सेंदूरवाफा) हे टॅग समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. साकोलीचे गटशिक्षणाधिकारी एम.व्ही. कोरे, बांते, भलावी, विषयतज्ज्ञ राहुल बडोले योग्य नियोजन करीत आहेत. तेजस प्रकल्पात सहभागी होणाºया शिक्षकांना सातत्यपूर्ण व्यवसायीक विकासासह इंग्रजीचे आॅनलाईन मार्गदर्शन मिळणार आहे. प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता निश्चितच वाढणार आहे.शाळा समृद्धीकरणतेजस प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षकांद्वारे शाळा समृद्धीकरणाचे काम सुरु झाले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी टॅग समन्वयकांच्या माध्यमातून काम प्रभावीपणे केले जात आहे. साकोली तालुक्यात हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.