शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बयाण न घेताच दिले तहसीलदारांनी निकालपत्र

By admin | Updated: January 26, 2017 00:49 IST

शेतजमिनीची आपसी वाटणी करण्याकरिता गैरअर्जदाराने तहसील कार्यालय मोहाडी येथे अर्ज सादर केला.

प्रकरण मोहाडी येथील पोटहिस्सा मोजणीचे : ‘क’ प्रत चुकीची आणि बयाणही बनावट मोहाडी : शेतजमिनीची आपसी वाटणी करण्याकरिता गैरअर्जदाराने तहसील कार्यालय मोहाडी येथे अर्ज सादर केला. तथापि, सदर पोटहिश्याच्या मोजणी प्रकरणात तहसीलदारांनी लेखी/तोंडी यापैकी बयाण न घेता आदेशपत्र पारित केल्याची तक्रार जांब येथील मोरेश्वर उके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जांब येथील शोभा नेरकर यांनी सामूहिक गट नंबर ५४९ मधील शेतजमीन आपसी वाटणीकरिता अर्ज केल्याचे तहसीलदार मोहाडी यांच्या आदेशात उल्लेख केला आहे. मोरेश्वर उके यांनी विकत घेतलेल्या शेतजमिनीची मोजणी प्रकरण क्रमांक १४६/२०१५/पोटहिस्सा २१ डिसेंबर २०१५ रोजी केला. त्या शेतजमिनीचे मोरेश्वर उके यांचे ०.८१ हेक्टर व शोभा नेरकर यांचे १.०६ हेक्टर असे दोन पोटहिस्से पाडण्यात यायला पाहिजे होते. परंतु शोभा नेरकर यांनी जमिनीची मोजणी करणाऱ्या व्यक्तीशी संगनमत केला. सदर जमिनीचे दोन पोटहिस्से मोजणीच्या ‘क’ प्रतमध्ये तीन पोटहिस्से पाडण्यात आले आहेत. मात्र पोटहिस्स्यामध्ये नावाचा व क्षेत्रफळाचा उल्लेख केला नाही. गटनंबरमध्ये मोरेश्वर उके व शोभा नेरकर यांचे दोनच भाग आहेत, हे उल्लेखनीय. मोजणी केलेली क प्रतच चुकीची तयार करण्यात आली आहे.तहसीलदार धनंजय देशमुख यांनी ११ जुलै २०१६ रोजी आपसी वाटणीचा चुकीचा निकालपत्र देऊन आदेश पारित केले आहे. या मोजणी प्रकरणात मोरेश्वर उके व त्यांची पत्नी यांना तहसील कार्यालयातून नोटीस दिले नाही. या दोघांना शेतजमिनीच्या वाटणीबाबत लेखी अथवा तोंडी बयाणही घेण्यात आले नाही. तथापि, तहसीलदार देशमुख यांनी सदर आदेशपत्रामध्ये मोरेश्वर उके व त्यांची पत्नी या दोघांचे बयाण घेतल्याचे नमूद केले आहे. बयाण घेताना बनावट व्यक्ती उभे केल्याचा संशय आहे. त्यामुळे वाटणीपत्राचा आदेश चुकीचा आहे. त्यामुळे तहसीलदारांनी पारित केलेला आदेश रद्द करण्यात यावा, जमिनीचा सातबारा पूर्ववत करण्याची मागणी मोरेश्वर उके यांनी केली असून दोषी अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याची मागणीही मोरेश्वर उके यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)शेतजमिनीच्या आपसी वाटणी प्रकरणात झालेली चुक दुरुस्त करण्यात आली. ज्यांनी या कामात चुकी केली त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- धनंजय देशमुख, तहसीलदार, मोहाडी.तहसील कार्यालयात बऱ्याच चुकीच्या बाबी होतात. काही प्रकार उजेडात आले तरच भंडाफोड होतो. शेतजमिनीच्या आपसी वाटणी प्रकरणात आर्थिक व्यवहार करून तहसीलदारांनी चूक केली आहे. - जगदीश उके, सदस्य पंचायत समिती, मोहाडी.