लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी रेल्वे उड्डाणपूल गोंदिया मार्गावरील बांधकामात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती आहे. भरावात फलाय अॅश भरुन दोन्ही बाजूला सिमेंट दगड ठेवण्यात आले. दगड ठेवतांनी प्रत्येक इंच ऊंची निश्चित करण्यात आली, परंतु प्रत्यक्ष कामात तफावत निर्माण झाल्याने रेल्वे फाटकासमोर ६० ते ७० मीटर अंतरावर तांत्रिक बिघाड आला. शनिवार व रविवारी येथे युध्दस्तरावर कामे करण्यात आली. महागडा बेल्टसह इतर काही साहित्यांचा त्यात नुकसान झाल्याचे समजते.देव्हाडी येथे फाटक क्रमांक ५३२ वर मागील चार वर्षापासून रेल्वे उड्डाणपूलाची कामे सुरु आहेत. पूल भरावात फलाय अॅशचा भराव करण्यात येत आहे. भरावापूर्वी पुलाच्या दोन्ही बाजूला सिमेंट दगड एकावर एक असे ठेवण्यात येते.रेल्वे फाटकापासून ते पूल अॅप्रोच मार्गावर उतार आहे. उतार हा इंचीप्रमाणे कमी करण्यात येत आहे. रेल्वे फाटकापासून ६० ते ७० मीटर अंतरावर उंचीत तांत्रिक बिघाड निर्माण झाला. स्थापत्य अभियंत्यांना चौकशी दरम्यान ही बाब लक्षात आली. त्यानंतर तांत्रिक बिघाड दूर करण्याकरिता शनिवार व रविवारी दिवसभर युध्दस्तरावर कामे करण्यात आली.फलाय अॅश खाली दोन्ही बाजुच्या दगडांना पकडीकरीता महागडा काळा बेल्ट लावण्यात आला आहे. सदर बेल्ट दगडातून काढण्यात आला.त्याकरिता त्यावर मोठ्या हातोड्याने तो तोडण्यात आल्याची माहिती आहे. दगडाची उंची कमी-जास्त करण्यात आली. येथे महागड्या साहित्यांचेही नुकसान झाले. याप्रकरणी स्थानिक कंत्राटदाराला विचारणा केली असता त्यांनी काहीच माहिती दिली नाही. स्थानिक नागरिकांनी शनिवारी सदर कंत्राटदार दिवसभर मजूरांना व यंत्र चालविणाऱ्यांना मोठमोठ्याने निर्देश देत होते.उड्डाणपूल बांधकामादरम्यान येथे कंत्राटदारानी तांत्रिक व अतांत्रीक कर्मचारी, मजूर वर्ग असतो, पंरतु तांत्रिक व स्थापत्य अभियांत्रिकी कर्मचारी येथे उपस्थित राहत नाही. त्यामुळे उड्डापूल बांधकामादरम्यान तांत्रिक बिघाड व अडचणी निर्माण होत असल्याचे समजते. उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने सबंधित विभागाचे तांत्रिक ज्ञान, अनुभव असणारे कर्मचारी येथे उपस्थित राहण्याची गरज आहे.सदर बांधकामादरम्यान तांत्रिक त्रुट्या निर्माण झाल्या तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य मार्गाचे नुकतेच राष्टÑीय महामार्ग म्हणून घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चितच सदर रस्त्यावर प्रचंड वाहतुक दिवसभर राहते. सदर निष्कर्ष राज्यमार्ग विभागाने केलेल्या सर्व्हेत समोर आली होती. निश्चितच दर्जेदार कामांची येथे अपेक्षा करण्यात येत आहे.
देव्हाडी उड्डाणपूल बांधकामात तांत्रिक बिघाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:55 IST
देव्हाडी रेल्वे उड्डाणपूल गोंदिया मार्गावरील बांधकामात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती आहे. भरावात फलाय अॅश भरुन दोन्ही बाजूला सिमेंट दगड ठेवण्यात आले. दगड ठेवतांनी प्रत्येक इंच ऊंची निश्चित करण्यात आली, परंतु प्रत्यक्ष कामात तफावत निर्माण झाल्याने रेल्वे फाटकासमोर ६० ते ७० मीटर अंतरावर तांत्रिक बिघाड आला.
देव्हाडी उड्डाणपूल बांधकामात तांत्रिक बिघाड
ठळक मुद्देदोन दिवस युद्धस्तरावर कामे : चौकशीदरम्यान उघडकीस आली बाब