शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

देव्हाडीच्या उड्डाणपुलामध्ये तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 22:17 IST

देव्हाडी येथील उड्डाणपूल काटकोनमध्ये नसल्याने त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे. पूल भरावातील राख पाण्यासह सतत वाहून जात आहे. गत चार वर्षापासून पुलातून राख वाहून गेली. त्यामुळे पूलावर भगदाड पडले होते.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : पूलावर भगदाड व खड्डे, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी येथील उड्डाणपूल काटकोनमध्ये नसल्याने त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे. पूल भरावातील राख पाण्यासह सतत वाहून जात आहे. गत चार वर्षापासून पुलातून राख वाहून गेली. त्यामुळे पूलावर भगदाड पडले होते. लहान खड्डेही येथे पडणे सुरु झाले आहे. पोकळी भरुन काढण्याकरिता वायब्रेटरचा उपयोग करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. संपूर्ण तांत्रिक बिघाड दूर होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यतेतून देव्हाडी येथील उड्डाणपूल बांधकाम सुरु आहे. २४ कोटींचा हा उड्डाणपूल आहे. मनसर- तुमसर- गोंदिया राष्ट्रीय महार्माचा दर्जा सदर रस्त्याला मिळाला आहे. सदर रस्ता चोवीस तास वर्दळीचा आहे. तुमसरकडील उड्डाणपूल पोचमार्ग काटकोनात नसल्याने पूलातून मोठ्या प्रमाणात राख वाहून गेली. याच बाजूला मोठा भगदाड पडला होता.पुलाच्या दोन्ही बाजूला दगडांना घट्ट पकडण्याकरिता बेल्टचा वापर करण्यात आला आहे. बेल्ट दोन्ही दगडांना पकडून ठेवत आहे. दरम्यान पूल भरावातील राख अतिशय गुळगुळीत आहे. दगडातील फटीतून ही राख वाहत आहे. पूलात पाणी शिरण्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. काटकोनात पूल नसल्याची माहिती येथे पुढे आली आहे. तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानेच पूलावर भगदाड व खड्डे पडणे सुरु झाले आहे.याकडे लक्ष देण्याची गरज आहे.देव्हाडी उड्डाणपूलात भरावात घातलेली राख तिरोडा येथील वीज कारखान्यातील रासायनिक फलाय अ‍ॅश आहे. सदर उघड्या राखेवर तिन्ही ऋुतूचा परिणाम होतो. ही राख वापरण्याची परवानगी बांधकाम विभागाने दिली आहे. संबंधित अधिकारी याकडे वायब्रेटरचा वापर करुन राखेला दाबण्याचे सांगत आहेत. सुरुवातीपासूनच सदर पूल चर्चेत आहे, पंरतु आजपर्यंत तज्ज्ञाचे पथक येथे आले नाही. केवळ संबंधित खात्याचे वरिष्ठ स्थापत्य अभियंते येथे पाहणी करुन जात आहेत.बांधकामाची गुणवत्ता कमी की तांत्रीक बिघाडउड्डाणपूलाचे बांधकामात सिमेंट दगडांचा वापर करण्यात आला आहे. येथे बांधकामाची गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आहे की तांत्रिक बिघाड याचा खुलासा केवळ संबंधित विषयाचे तज्ज्ञच करु शकतात. राज्य शासनाने पूलाबाबत गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश येथे देण्याची गरज आहे.