शिक्षणाधिकाऱ्यांचे आश्वासन : १८ नोव्हेंबरपासून निवड श्रेणी प्रशिक्षणाला सुरूवातभंडारा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा भंडाराचे शिष्टमंडळ शिक्षणाधिकारी (प्राथ.) के.झेड. शेंडे यांची भेट घेवून शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यासंबंधी जिल्हाध्यक्ष ईश्वर नाकाडे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करण्यात आली. तातडीने समस्या सोडविण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी यांनी दिले. यात प्रामुख्याने शिक्षकांचे दरमहा वेतन आॅनलाईन १ तारखेला देणे, शिक्षकांची अशैक्षणिक कामातून सुटका करणे, शिक्षकांचे समायोजन करणे, मुख्याध्यापकाचे पदविधर केंद्र, विस्तार अधिकारी यांची पदे सेवाजेष्ठतेनुसार भरणे, चट्टोपाध्याय, निवडश्रेणी प्रस्ताव निकाली काढणे, हिंदी, मराठी परीक्षेपासून सुट मिळणे, निवडश्रेणी प्रशिक्षण आयोजित करणे, वैद्यकीय बिल, रजा प्रवास देयके निकाली काढणे, १९९५ नंतर सेवेतील शिक्षकांना कायम आदेश देणे, शाळा अनुदान व देखभाल दुरूस्ती अनुदान त्वरीत अदा करणे, पदविधर शिक्षकांची मानिव वेतन श्रेणी लागू करणे, मुळची पेंशन योजना लागू करून अंशदायी पेंशन योजना रद्द करून रक्कम खात्यात जमा करणे इत्यादी मागण्याचा समावेश होता.दिवाळीपूर्वी आॅक्टोबर १५ चे वेतन दिले जाईल व सोबतच सन अग्रीम १० हजार रूपये अदा करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. शिष्टमंडळात राज्य प्रतिनिधी मोहन पडोळे, सचिव हरिकिसन अंबादे, कोषाध्यक्ष बलवंत भाकरे, कार्याध्यक्ष रामभाऊ कोरे, विवेक हजारे, श्रीधर काकीरवार, दु.ना. बोरकर, डी.आर. जिभकाटे, प्रमोद हटेवार, अविनाश शहारे, सतिश वासनिक, ओम वाघाये, भैय्या मेश्राम, नेमीचंद साखरे, गणेश खोकले, राजेंद्र चौधरी आदी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
शिक्षकांच्या समस्या मार्गी लागणार
By admin | Updated: November 1, 2015 00:50 IST