अध्यापनाकडे दुर्लक्ष : माहिती ठरली क्लेशदायकतुमसर : प्राथमिक शिक्षकापासून ते उच्च माध्यमिक शिक्षक तथा विद्यार्थ्यांची सरल आवश्यक माहितीच्या नावाखाली विविध प्रमाणपत्रासह संगणीकृत माहिती सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहे. शैक्षणिक सत्र सुरु होऊन एक महिना झाला, परंतु अध्यापनाचे महत्वपूर्ण कार्य सोडून शिक्षक केवळ कागदी कामात गुंतल्याचे चित्र सर्वच शाळेत दिसत आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षकांची तथा प्रत्येक विद्यार्थ्यांची अपडेट माहिती सरल आवश्यक शिक्षक, विद्यार्थी माहितीचा पुराव्यासोबत माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहे. विद्यार्थ्यांकरिता आधारकार्ड, नाव, आईचे नाव, वर्ग, दाखल खारीज क्रमांक तर शिक्षकांना शिक्षकांच्या नावासहीत, शिक्षण, आधार क्रमांक कुटुंबाच्या सकस्यांचे आधार क्रमांक, वैवाहिक माहिती, शिक्षणाची सविस्तर माहिती, सध्याचे पद वेतन, भविष्य निर्वाह निधी, धर्म, जात इतर खासगी माहिती, नियुक्ती आदेश, प्रशिक्षण, कौटुंबिक माहिती विचारण्यात आली आहे. दोन पानाची माहिती सादर करावी लागणार आहे. विद्यापिठाची डिग्री देणे अनिवार्य आहे. संगणीकृत करणे आहे म्हणून हार्ड कॉपी तथा सॉफट कॉफी सादर करावी लागत आहे. शिक्षकांचा वेळ ही कागदपत्रे गोळा करणे, माहिती भरणे यातच जात आहे. शिकविण्याला सध्या विरामाचे चित्र दिसत आहे. अनेक शिक्षकांनी कागदपत्राकरिता धावपळ सुरु आहे. वेळेत माहिती देण्याचा धसका अनेक शिक्षकांनी घेतला आहे. २० दिवसानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना यातून सूट देण्यात आली नाही. आयुक्तांच्या शेवअच्या उंबरठ्यावरही कागदपत्रे थरथरत्या हाताने गोळा करावी लागत आहेत. केवळ माहिती गोळा करण्याचा फार्स शिक्षण विभागात सुरु आहे. वारसदार कोण येईल याचीही माहिती देणे अनिवार्य आहे. माहिती गोळा केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या वर्षी दुसरी माहिती शासन सातत्याने मागवित आहे. हे विशेष. अनेक शाळात शिक्षक नाही, शिक्षकांचा दर्जा खालवला आहे. विद्यार्थी नाही, शाळांची तपासणी होत नाही. अनेक खाजगी शाळेत शिक्षक कामावर न जाता वेतन उचलत आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत शिक्षण विभागाला अंकुश लावता आले नाही. या चौकशीमुळे बोगस विद्यार्थी व बोगस शिक्षकांच्या नियुक्तीवर आळा बसेल असे शासन सांगत आहे. केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार आहे. शिक्षकांची मान्यतेचा आदेश शासनस्तरावरुन होते. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांना माहितीचा ‘सरल’ धसका
By admin | Updated: August 9, 2015 00:56 IST