शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 22:29 IST

जिल्हा प्रशासनाने सुरु केलेला सक्षम हा उपक्रम शिक्षकांसाठी अनिवार्य नसून ऐच्छिक आहे. स्वत:मध्ये बदल करण्यासाठी तसेच चौकटीबाहेर पडण्यासाठी सक्षम हा उत्तम मार्ग आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : सक्षमच्या प्रशिक्षणात ३०० शिक्षकांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा प्रशासनाने सुरु केलेला सक्षम हा उपक्रम शिक्षकांसाठी अनिवार्य नसून ऐच्छिक आहे. स्वत:मध्ये बदल करण्यासाठी तसेच चौकटीबाहेर पडण्यासाठी सक्षम हा उत्तम मार्ग आहे. शालेय शिक्षणासोबतच कौशल्य व मुल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. स्वत:मधील शक्ती व क्षमता ओळखण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. स्वत:लाच प्रोत्साहित करणे हे एक आव्हान असतं. शिक्षकांनी हे आव्हान पेलून स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवावा व आपल्या नाविण्यपूर्ण संकल्पनेतून विद्यार्थी घडवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.सक्षम उपक्रमांतर्गत जिल्हयातील ३०० निवडक शिक्षकांचे चार दिवसीय प्रशिक्षणास आजपासून हेमंत सेलिब्रेशन येथे सुरुवात झाली आहे. फिनलँड येथील कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन या संस्थेचे प्रमुख हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वात हे प्रशिक्षण देण्यात येत आहे.या प्रशिक्षणाच्या उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, मनिषा दांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे व सक्षमची टिम यावेळी उपस्थित होती.प्रचलित शिक्षण पध्दतीसोबतच मुल्य व कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज आहे. यावर आधारित उपक्रम जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे.सक्षम हा उपक्रम सरकारी नसून तो शिक्षकांनी शिक्षकांसाठी स्वच्छेने तयार केला आहे. त्यामुळे तो अनिवार्य नसून ऐच्छिक आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. ज्या शिक्षकांना चौकटीबाहेर पडून काहीतरी नाविण्यपूर्ण करण्याची इच्छा आहे. त्यांचे सक्षममध्ये स्वागत आहे. तोच तोच अभ्यास त्याच त्याच पध्दतीने केल्यामुळे अनेकवेळा अपयश प्राप्त होते. हा संशोधकाचा निष्कर्ष आहे. ही पध्दती शिक्षकांनी आत्मसात करावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केली. फिनलँड येथील कौन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशन या संस्थेचे प्रमुख हेरंब कुलकर्णी यांनी विविध देशांच्या शिक्षण पध्दतीचा अभ्यास करुन काही तंत्र विकसित केले आहे. त्यावर आधारित हे प्रशिक्षण आहे. कुलकर्णी म्हणाले की, कौशल्य व मुल्यांचा संबंध हा मुळ अभ्यासक्रमाशीच आहे. अभ्यासाव्यतिरिक्त काही नसून गुणवत्तापूर्ण विकास मात्र वेगळया पध्दतीने म्हणजेच सक्षम असे ते म्हणाले. फिनलँड हा देश शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर आहे असे सांगून कुलकर्णी म्हणाले की, क्लासरुम एन्व्हायर्मेट, मुलांमध्ये विषयाबद्दल उत्सुकता निर्माण करणे, मुलांच्या मनातील भिती दूर करणे व मुक्त वातावरणातील शिक्षण यामुळेच शैक्षणिक प्रगती शक्य आहे.चार दिवसीय प्रशिक्षणात शिक्षकांना विविध विषयावरील चित्रफित दाखविण्यात येणार आहे. जगातील अनेक देशात कशा प्रकारे शिक्षण दिल्या जाते. याबाबतची माहिती व त्यासाठी लागणारी तयारी आदी बाबत शिक्षकांना या प्रशिक्षणात माहिती देण्यात येईल.