शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची जि.प.वर धडक

By admin | Updated: October 7, 2016 00:43 IST

मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्या जिल्हा परिषद प्रशासनाने प्रलंबित ठेवल्या आहेत.

शाळा पडल्या ओस : शिक्षकांमध्ये पसरतोय असंतोष भंडारा : मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या समस्या जिल्हा परिषद प्रशासनाने प्रलंबित ठेवल्या आहेत. त्या समस्या निकाली काढण्यात यावे, यामागणीसाठी गुरूवारला जिल्ह्यातील सुमारे ४ हजार शिक्षकांनी सामूहिक रजा घेऊन शाळा बंद आंदोलन केले. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या मागण्यांकडे पाठ दाखविल्यामुळे शिक्षकांमध्ये कमालिचा असंतोष पसरला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत या शिक्षकांनी उद्यापासून साखळी उपोषण करण्याचा ईशारा दिला आहे.जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन शिक्षक कृती समितीची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांनी त्यांचे वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेला द्यावे, या मागणीसह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्याचा इशारा महिनाभरापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाला कृती समितीने दिला होता. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील ७६७ जिल्हा परिषद व ३२ जिल्हा परिषद हायस्कुल शाळेतील शिक्षकांनी एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सातही तालुक्यातील हजारो शिक्षक सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेवर धडकले. या आंदोलनाचे नेतृत्व रमेश सिंगनजुडे, मुबारक सय्यद, ओमप्रकाश गायधने, धनंजय बिरणवार, वसंत साठवणे, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, युवराज वंजारी, विकास गायधने, केशव बुरडे, राजन सव्वालाखे, दिलीप बावनकर, सुधीर वाघमारे, रजनी करंजेकर, नेपाल तुरकर, संदीप वहिले, सुधाकर ब्राम्हणकर, जी.एस. भोयर, हरिकिसन अंबादे, रमेश पारधीकर, प्रमोद घुमे, मुकुंद ठवकर, महेश गावंडे यांनी केले. दुपारी ३ वाजताच्या सुमारास शिक्षक कृती समितीच्या शिष्टमंडळाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात चर्चेकरिता बोलाविण्यात आले. यावेळी समितीचे शिष्टमंडळ जिल्हा परिषदेत पोहोचले. सीईओंनी शिक्षकांच्या आंदोलनाला पाठ दाखविल्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला होता. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या कक्षात जाऊन व्यथा मांडल्या. मुख्य कार्यपालन अधिकारी एल.एल. अहिरे यांची प्रतीक्षा करूनही ते न आल्यामुळे आंदोलनकर्ते शिक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. (शहर प्रतिनिधी)अध्यक्षांनी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना खडसावलेधरणे आंदोलनात सहभागी हजारो शिक्षकांचे शिष्टमंडळ जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्याकडे पोहोचले. यावेळी गिलोरकर यांनी सीईओ अहिरे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधूही त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शिक्षकांनी रोष व्यक्त केला. दरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळके हे गिलोरकर यांच्या कक्षात आले. यावेळी वाळके यांनी एक दिवसापूर्वी गिलोरकर यांनी सीईओ मुंबईला गेल्याचे खोटे सांगून फसगत केल्याचा रोष व्यक्त केला. वाळके यांना खडेबोल सुनावताना गिलोरकर यांनी सीईओंची पूर्ण माहिती ठेवा, कुणालाही खोटी माहिती देऊ नका, असे सांगून धारेवर धरले. जिल्हा परिषद अध्यक्षांचा संताप बघून सुधीर वाळके यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला.सीईओंची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार४शिक्षकांनी न्याय्य हक्कासाठी धरणे आंदोलन केले. त्यांच्या मागण्यांची पुर्तता करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी एल.एल. अहिरे यांची होती. मात्र आंदोलनाला पाठ दाखविली. दरम्यान याबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली. सोबतच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) यांच्या वागणुकीमुळे कृती समितीमध्ये असंतोष पसरला असून शिक्षकांना न्याय द्यावा, अशी तक्रार जि.प.अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे केली आहे.