शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
2
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
3
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
4
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
5
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
6
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
7
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
8
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
9
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
10
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
11
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
12
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
13
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
14
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
15
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
16
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
17
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
18
टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का?
19
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
20
"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

शालेय पोषण आहार माहितीसाठी शिक्षकांची ‘परीक्षा’

By admin | Updated: July 21, 2016 00:27 IST

शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत पोषण आहार पुरवठा करण्यात येतो.

आॅनलाईनचा अडथळा : माहिती न भरल्यास अनुदानाला मुकावे लागणारभंडारा : शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत पोषण आहार पुरवठा करण्यात येतो. या शैक्षणिक सत्रापासून राज्यभरात शिक्षकांना शालेय पोषण आहाराची माहिती आॅनलाईन भरण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मात्र अनेक शाळांमध्ये संगणक आहे तर इंटरनेट नाही, जिथे संगणक व इंटरनेट आहे तेथील शिक्षकांना संगणक हाताळण्याचे ज्ञान नसल्याने आहाराची माहिती आॅनलाईन भरण्यासाठी शिक्षकांची परीक्षाच सुरू झालेली आहे.राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मागील वर्षीपर्यंतचा शालेय पोषण आहाराबाबतचा अनुभव किंवा तक्रारी बघता, यावर्षी पोषण आहाराच्या अनुदानाबाबत पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. याअनुषंगाने, शिक्षण विभागाने यावर्षीचे नविन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच राज्यभरातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकांसाठी शालेय पोषण आहारची माहिती संगणकावर आॅनलाईन भरण्याचे आदेश बजावले आहे.अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक आहेत. परंतु आजही अनेक शिक्षकांना संगणक हाताळता येत नाही. तर अनेक शाळांमध्ये संगणक असूनही इंटरनेटची सुविधा नसल्याने आॅनलाईन माहिती भरताना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे. ग्रामीण क्षेत्रातील अनेक शाळांमध्ये विद्युत पुरवठा नाही नसल्याने अनेक ठिकाणी संगणक नाहीत. त्यामुळे आॅनलाईन माहिती भरण्यासाठी शिक्षकांना शाळा सोडून तालुकास्थळी किंवा अन्यत्र जावे लागत आहे. यामुळे शिक्षक शाळेत बराचवेळ अनुपस्थित राहत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर शिक्षकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी) हे टाळण्यासाठी आॅनलाईनचा खटाटोपशालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पोषण आहार दररोज मिळेल. जे विद्यार्थी शाळेत अनुपस्थित राहणार त्यांनाच हा पोषण आहार मिळणार आहे. याप्रक्रियेमुळे विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्याच्या नावावर पोषण आहार उचलून त्याची अफरातफर करता येणार नाही. या सर्व बाबी टाळण्यासाठी शिक्षण विभागाने आता रोज शालेय पोषण आहाराचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरण्याच्या सुचना दिल्या आहेत.शासनाने दिलेल्या निदेशाचे पालन करण्याचे सुचना गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांना दिल्या आहेत. शालेय पोषण आहाराची माहिती दररोज आॅनलाईन शासनाला पाठवावयाची आहे. पोषण आहाराची माहिती अद्ययावत राहिल्यास यात अफरातफर होणार नाही. त्यामुळे सर्व मुख्याध्यापकांनी आॅनलाईन माहिती भरावी.- किसन शेंडे, शिक्षणाधिकारी, भंडारा.आहार योजनेची माहिती स्वतंत्र यंत्रणेकडून राबविण्याच्या सुचना आहेत. मात्र यात मुख्याध्यापकांना वेठीस धरण्यात येत आहे. शासनाने गटसाधन केंद्रावर ही माहिती भरण्यासाठी डाटा आॅपरेटर्सची नेमणूक केलेली आहे. त्यांच्याकडून ही माहिती भरण्याची व्यवस्था केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. - मुबारक सय्यद, जिल्हाध्यक्ष. महा. राज्य. प्राथ. शिक्षक संघ. भंडारा.