शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शिक्षकांच्या ‘रूजू’ तारखेचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:15 IST

आॅनलाईन लोकमतभंडारा : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत भंडारा जिल्हा परिषदमध्ये रूजू झालेल्या शिक्षकांची ‘साडेसाती’ संपलेली नाही. मे महिन्यात कार्यमुक्त होऊन भंडाऱ्यात रूजू झालेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदने १ जुलै २०१७ पासून रूजू करून घेण्याचे आदेश बजावले. यात तीन महिन्यांचा कालखंड सुटल्याने शिक्षकांची सेवाज्येष्ठतेसह अन्य शासकीय सुविधांपासून वंचित राहण्याचा प्रसंग ओढवला आहे.महाराष्ट्र राज्य ...

ठळक मुद्देतीन महिन्याची सेवा खंडीत : मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतभंडारा : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत भंडारा जिल्हा परिषदमध्ये रूजू झालेल्या शिक्षकांची ‘साडेसाती’ संपलेली नाही. मे महिन्यात कार्यमुक्त होऊन भंडाऱ्यात रूजू झालेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदने १ जुलै २०१७ पासून रूजू करून घेण्याचे आदेश बजावले. यात तीन महिन्यांचा कालखंड सुटल्याने शिक्षकांची सेवाज्येष्ठतेसह अन्य शासकीय सुविधांपासून वंचित राहण्याचा प्रसंग ओढवला आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सैयद, प्राथमिक शिक्षक सहकारी संस्थेचे अध्यक्ष संजीव बावनकर यांच्या नेतृत्वात आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील शिक्षकांनी बुधवारला मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांना निवेदन दिले. या निवेदनात आंतरजिल्हा बदलीद्वारे ९ मे २०१७ नंतर कार्यमुक्त होऊन ११७ शिक्षक भंडारा जिल्हा परिषदमध्ये रूजू झाले. बदली प्रक्रियेतील काही शिक्षकांना भंडारा पंचायत समितीमध्ये रूजू करून घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. या प्रकरणात काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने या शिक्षकांना १ जुलै २०१७ ला रूजू करून घेण्यासंदर्भात आदेश निर्गमीत केले होते.दरम्यान तीन महिन्यांपर्यंत या शिक्षकांना रूजू करून घेण्यास टाळाटाळ झाल्याने या शिक्षकांची सेवा खंडीत झाल्याचा प्रकार समोर आला आहे.अशा प्रशासकीय बाबीमुळे अधिकारी व शिक्षक यांच्यात रूजू तारखेबाबत संभ्रम आहे. संबंधित शिक्षक ज्या तारखेला कार्यमुक्त होऊन भंडारा येथे रूजू होण्यासाठी आले त्या तारखेपासून शिक्षकांची सेवासातत्य ठेवण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच त्यांचे मागील दोन महिन्यांचे नियमित वेतन काढून वार्षिक वेतनवाढ मंजूर करावी अशी मागणी करण्यात आली.शिष्टमंडळात कैलाश बुद्धे, अरविंद बारई, शुद्धोधन बोरकर, निशीकांत बडवाईक, रुपेश झलके, किशोर धरमसहारे, कल्पेश झलके, विशाल गिऱ्हेपुंजे, शामकला भिवगडे, वैशाली बांते, भास्कर हटवार आदींचा समावेश होता.