शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

आश्रमशाळेतील शिक्षकांना वेतन नाही

By admin | Updated: May 3, 2016 00:42 IST

भंडारा जिल्ह्यातील सहा आदिवासी अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतन मिळालेला नाहीत.

प्रकल्प अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : सहा आदिवासी आश्रम शाळांतील प्रश्नयुवराज गोमासे  भंडाराभंडारा जिल्ह्यातील सहा आदिवासी अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतन मिळालेला नाहीत. वेतना अभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ असताना आदिवासी प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांचे या प्रश्नाकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.जिल्ह्यात आदिवासी प्रकल्प विभागामार्फत सहा आदिवासी अनुदानित आश्रम शाळा कार्यरत आहेत. यामध्ये आदिवासी आश्रम शाळा येरली, कोका, आंबागड, चांदपूर, माडगी, टेकेपार, आदर्श आमगाव या अनुदानित आश्रम शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतन मिळालेले नाहीत. हायस्कूलच्या शिक्षक व कर्मचारी वर्गाला माहे फेब्रुवारी २०१६ पासून तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक व कर्मचारी वर्गाला माहे जानेवारी २०१६ पासून वेतन मिळालेले नाहीत. चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे. विभागाचे अधिकारी मात्र मौजेत दिवस काढत आहेत.वेतन निधी प्रकल्प विभागाला मिळालेला नाही. त्यामुळे पगार देण्यास विनलंब होत आहे, असे कारण प्रकल्पाकडून शिक्षक व कर्मचाऱ्यांना सांगितले जाते. मात्र ही वस्तुस्थिती नाही. आदिवासी विभागाला शासनाकडून सर्वाधिक निधी दिला जातो. राज्यात यापेक्षा मोठा निधी कोणत्याही सेवा विभागाला दिला जात नाही. परंतू येथील अधिकारी व कर्मचारी कामचुकार आहेत. त्यांच्या नियोजनशुन्य धोरणांमुळे परिस्थिती विपरीत झाली आहे. शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या १ तारेखला वेतन विणाविलंब देण्याचे आदेश आहेत. १ तारखेला नका देवू निदान १० ते १५ तारखेपर्यंत तरी वेतन दिले गेले पाहिजे. मात्र शासनाच्या या आदेशाला येथील अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून हरताळ फासल्या जात आहे, असा आरोप होत आहे.आॅनलाईन यंत्रणा वेळोवेळी काम करीत नसल्याचे कारण वेळोवेळी दिले जाते. सर्व विभागाच्या यंत्रणा बरोबर काम करीत असताना यांच्याच यंत्रणेत बिघाड कसा होतो, प्रकरणी चौकशी होण्याची मागणी होत आहे. आरोप व वेतनाच्या संबंधात प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाईल स्विच आॅफ असल्याने संपर्क होवू शकला नाही.