शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

शिक्षकांच्या खिशाला भुर्दंड

By admin | Updated: August 11, 2015 00:48 IST

राज्य शिक्षण विभागाने प्राथमिक शाळेपासून ते उच्च माध्यमिक विद्यालय तथा शिक्षक व विद्यार्थ्यांची महत्वाची माहती संगणीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्याध्यापकांची उडाली धांदल : सरल प्रणालीचा फटकापुरुषोत्तम डोमळेसानगडीराज्य शिक्षण विभागाने प्राथमिक शाळेपासून ते उच्च माध्यमिक विद्यालय तथा शिक्षक व विद्यार्थ्यांची महत्वाची माहती संगणीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हयातील २२९ माध्यमिक शाळातील ४५ हजार ४४४ विद्यार्थ्यांसह १ हजार ४४३ शिक्षकांचा सरल प्रणालीत सहभागी आहे. परंतु सदर शाळेमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने शिक्षकांच्या खिशावर आर्थिक भुर्दंड पडत आहे. तसेच अल्प कालावधीत शाळांना माहिती संकलित करावयाची असल्याने शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापकांची धांदल आली आहे.तंत्रज्ञानाच्या काळात हा निर्णय योग्य व प्रशसनीय आहे. पंरतु माहिती १५ आॅगस्ट पर्यंत न भरल्या शिक्षकांच्या वेतनावर गडांतर येणार हा निर्णय चुकीचा आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षका विभागाने प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षकांची तथा प्रत्येक विद्यार्थ्यांनी अपडेट माहिती सरल आवश्यक शिक्षक, विद्यार्थी माहितीच्या पुराव्यासोबत माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांकरिता आधार कार्ड, नाव, आईचे नाव, वर्ग दाखल खारिज क्रमांक तर शिक्षकांना नावास हित, शिक्षण, आधार क्रमांक, वैवाहिक माहिती शिक्षकाचंी सविस्तर माहिती, सदयाचे पद वेतन, भविष्य निर्वाह निधी, धर्म, जात, नियुक्ती, आदेश, प्रशिक्षण, कुटूंबाची सरल प्रणालीकरिता स्कुलडेटा फार्म, टिचर डेटा प्रति दोन फार्म व विद्यार्थी डेटा प्रति शिक्षक दोन फार्म या प्रमाणे शेकडो फार्मचा समावेश सरल संगणकीय प्रणालीद्वारे सेव्ह करायचा असून याकरिता इंटरनेट स्कॅनरचा वापर करावा लागत आहे. शाळांमध्ये सदर यंत्र सामग्री उपलब्ध नसल्याने शिक्षकांच्या खिशावर आर्थिक भुर्दंड पडत आहे. एका वर्गाची माहिती संगणीकृत करण्यासाठी दोन-दोन दिवस लागत आहे. कधी इंटरनेट सुरु तर कधी इंटरनेट बंद असे चित्र पहावयास मिळत आहे. काही शाळांनी वर्गणी करुन स्कॅनर खरेदी केला आहे. तर काही शाळेचे शिक्षक कॅम्प्युटर इन्स्टीट्यूट मध्ये जावून तासन्तास बसत असल्याचे दिसून येत आहे. शिकविण्याला सहया विरामाचे चित्र दिसत आहे. अनेक शिक्षकांची कागदपत्र गोळा करण्यासाठी धावपळ सुरु आहे. सरल प्रणालीमुळे बोगस विद्यार्थी व बोगस शिक्षक नियुक्तीवर आळा बसेल असे शासन नाकाला जिभ लावून सांगत असेल तरी शासनाची नव्याची नवलाई व कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार आहे.जिल्हयातील शिक्षक डाटा अपडेट करण्यासाठी व्यस्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सरल प्रणालीची माहिती संगणीकृत करण्यासाठी मुदत वाढवून दयावी. १५ आॅगस्टपर्यंत सरल प्रणाली संगणीकृत न झाल्यास वेतनावर गडांतर येणार हा शासनाचा निर्णय चुकीचा आहे. शिक्षक संघटना याबाबद शासन स्तरावर चर्चा घडवून आणतील. - अंगेश बेहलपांडेजिल्हा सचिव, म.रा.शिक्षक परिषद