शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

आश्चर्यकारक घटनांचा छंद जोपासणारा शिक्षक

By admin | Updated: October 5, 2015 00:58 IST

कुणाला जुने नाणे, कॅसेट, आवाज तथा आश्चर्यकारक कला गोळा करण्याचा छंद असतो. ग्रामीण भागात वास्तव्य करून एका शिक्षकाने चक्क लोकमत वृत्तपत्राची कात्रण गोळा करण्याचा छंद जोपासला आहे.

आश्चर्यकारक व अद्भुत घटनांची नोंदरंजित चिंचखेडे चुल्हाडकुणाला जुने नाणे, कॅसेट, आवाज तथा आश्चर्यकारक कला गोळा करण्याचा छंद असतो. ग्रामीण भागात वास्तव्य करून एका शिक्षकाने चक्क लोकमत वृत्तपत्राची कात्रण गोळा करण्याचा छंद जोपासला आहे. चंद्रशेखर लखपत गणवीर असे या छंदवेळ्या शिक्षकाचे नाव आहे. बिनाखी येथील मुळचे चंद्रशेखर यांना वृत्तपत्र वाचनाची आवड आहे. अनेक घटना तथा गरजेच्या बातम्यांची नोंद करून वाचक मोकळे होतात. परंतु याच वृत्तपत्रात सामान्य ज्ञान वाढविणारे नोंदी तथा आश्चर्यकारक घटनांचे वृत्तांकन असतात. त्याची कात्रण गोळा करण्याचा छंद जोपासणारे क्वचितच सापडतील. बालपणापासून हा छंद जोपासला आहे. त्यांनी ही हौस शिक्षक म्हणून नोकरीवर रूजू झाल्यावरही सुरू ठेवली आहे. विद्यार्थ्यांच्या मनात सामान्य ज्ञान जोडण्याची जिद्द असल्याने टेमनी येथील सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत चंद्रशेखर यांनी लोकमतचा आधार घेतला. ते १९९४ पासून विविधांगी विषयावर लिखान झालेले कात्रम गोळा करीत आहेत. त्यांचे संग्रहात ९० कोटींची सायकल, ५५० किलो गॅ्रम वजनाचा माणूस, जगातील सर्वात मोठा पुल, ९८ टक्के शरीरावर केसाळ असलेला माणूस, पळसाला पाच पाने, सापाचा विष पचविणारा माणूस, पुरुष बाळंत झाला, एकाच झाडाला चार प्रकारचे फळे, वयाच्या ९ व्या वर्षी १० वी पास, पोपटाने अंडे दिले, ४११ दिवस काहीही न खाता जिवंत, दाढी मिशावाल्या बाला, माणूस जेवणानंतर रवंथ करतो, दुग्ध देणारा बोकड अशा तब्बल १,१०० कात्रण गोळा केले असून त्यांचा हा छंद आजतागायत सुरु आहे.१४ नोव्हेंबर १९९४ ला लोकमतमध्ये गाठ मैत्रीची अशी कहाणी, दोघांची एकच पत्नी, अशा आशयाची एक बातमी प्रकाशित झाली होती. वृत्तपत्राचे आकलन आणि वाचन करीत असताना त्यांनी ही बातमी टिपली. ही बातमी वाचून ते प्रभावित झाले. अशा घटना क्वचितच घडतात. यामुळे आश्चर्यकारक व अद्भूत घटनांचे कात्रण गोळा करण्याचे विचार त्यांचे मनात आले. या बातमीच्या कात्रणाने सुरुवात केली. याबाबत ते म्हणतात, वृत्तपत्रात अनेक बातम्या प्रकाशित होतात. बातम्या बरेच काही सांगून जातात. आदल्या दिवशी प्रकाशित होणाऱ्या बातम्या पुन्हा प्राप्त होत नाही. यामुळे या बातम्यांची कात्रण गोळा करीत आहे.सामान्य ज्ञानात भर घालणाऱ्या माहितीच्या नोंदी मिळते. अनेक विद्यार्थी या संग्रहालयात धाव घेत आहेत. त्यांच्या कार्यात पत्नी विणा यांचे सहकार्य असल्याचे त्यांनीे सांगितले. वाचक, विचार आदींची जोड दिल्याने त्यांचे संग्रहात कात्रणांचा हजारांचा पल्ला गाठला आहे. लोकमतचे गेल्या १९ वर्षापासून वाचक असल्याचे अभिमानाने ते सांगतात. जनसामान्यांचे व्यासपीठ, न्यायासाठी भांडणारे, विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी या वृत्तपत्राचे प्रयत्न निश्चितच यात अभिमानास्पद बाब ठरली आहे. त्यांच्या या छंदामुळे अनेक तरुणांना नोकरीविषयक मार्गदर्शन मिळत आहे. नोकरी पेशा सांभाळून त्यांनी जोपासलेला हा छंद अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्यामुळे परिसरात त्यांची छंदवेड्या शिक्षक अशी झाली आहे.