शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक हाच समाजाचा खरा शिल्पकार

By admin | Updated: December 27, 2016 01:04 IST

शिक्षक हा समाजाचा प्रमुख घटक आहे. विद्यार्जनातून भावी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.

भाग्यश्री गिलोरकर : आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा, चार महिन्यानंतर पार पडला शिक्षक दिनाचा कार्यक्रम भंडारा : शिक्षक हा समाजाचा प्रमुख घटक आहे. विद्यार्जनातून भावी पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. मराठी शाळांची अधोगती थांबविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी. शिक्षक हाच समाजाचा खरा शिल्पकार असून शिक्षकच समाजाचा आरसा असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांनी केले. जिल्हा परिषद सभागृहात आज सोमवारला जिल्ह्यातील ९ आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, नीळकंठ कायते, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अभयसिंह परिहार, उपशिक्षण अधिकारी चोले उपस्थित होते. यावेळी गिलोरकर म्हणाल्या, जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती होत आहे. ती निरंतर टिकावी यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करणे गरजेचे आहे. शिक्षकांनी विद्यार्जनातून विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन करावे, असे आवाहन केले. यावेळी महिला व बालकल्याण सभापती शुभांगी रहांगडाले म्हणाल्या, शिक्षक नसते तर समाज घडला नसता. शिक्षकांनी कुठल्याही अपेक्षेविना पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे. शिक्षकांच्या योग्य कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करावे. शिफारसपत्राची जोड लावणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले म्हणाले, शिक्षणाची नैतिकता कमी झालेली आहे. विद्यार्थ्यांना देशभक्तीचे धडे देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. नीळकंठ कायते म्हणाले, शिक्षकांनी राजकारणाला बळी पडू नये. शिक्षकांनी स्वत:ची जबाबदारी योग्य प्रकारे सांभाळावी, असे प्रतिपादन केले. पुरस्कार विजेते संजय आजबले व दिपीका बांते यांनी पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्यावतीने मनोगत व्यक्त केले. दरम्यान शिक्षक रसेसकुमार फटे यांच्या घोषवाक्य लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन अतिथींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मांढळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आमना सय्यद, इटगावचे संजय आजबले, रेंगेपारचे संतोष खंडारे, बिडचे विलास बाळबुध्दे, वडेगावच्या लिला टेंभरे, लवारीचे केशव अतकरी, ठाणाचे जिवनप्रकाश काटेखाये या प्राथमिक गटातील शिक्षकांचा तर माध्यमिक गटातील वरठी येथील शिक्षीका दिपीका बांते व बारव्हा येथील नामदेव शेंडे या शिक्षकाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षक संघटनेचे रमेश सिंगनजुडे, मुबारक सय्यद, ओमप्रकाश गायधने, धनंजय बिरणवार, वसंत साठवणे, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, विकास गायधने, मुकूंदा ठवकर, संदीप वहिले, राजेश सव्वालाखे यांच्यासह शिक्षक बांधव व विस्तार अधिकारी जगदिश उके, अविनाश भानारकर व अर्चना माटे उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षणाधिकारी अभयसिंग परिहार यांनी केले. संचालन योगेश पुडके यांनी तर आभार उपशिक्षणाधिकारी चोले यांनी केले. (शहर प्रतिनिधी) सभापतींची अनुपस्थिती शिक्षकांमध्ये नाराजी ४जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने तब्बल चार महिन्यानंतर घेण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती राजेश डोंगरे, कृषी व पशूसंवर्धन सभापती नरेश डहारे, बांधकाम सभापती विनायक बुरडे, समाजकल्याण सभापती नीळकंठ टेकाम यांची या कार्यक्रमातील अनुपस्थिती उपस्थितांना जाणवली. यासंदर्भात राजेश डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कार्यक्रमासाठीच आलेलो होतो. परंतु महत्त्वाचे काम वेळेवर आल्यामुळे व हा कार्यक्रम उशिरा सुरू झाल्यामुळे उपस्थित राहता आले नाही.