शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक सहलीवर, शाळा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:24 IST

शिक्षक सहलीवर व शाळा वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील मुंढरी (बुज.) येथील नूतन विद्यालयात मंगळवारला दिसून आला.

ठळक मुद्देमुंढरीबुज शाळेतील प्रकार : चौकशी करून दोषीविरूद्ध कारवाईची मागणी

आॅनलाईन लोकमतकरडी (पालोरा) : शिक्षक सहलीवर व शाळा वाऱ्यावर सोडण्यात आल्याचा प्रकार मोहाडी तालुक्यातील मुंढरी (बुज.) येथील नूतन विद्यालयात मंगळवारला दिसून आला. मुख्याध्यापक शिक्षकांत भेदभावपूर्ण व्यवहार करीत असून मर्जीतील शिक्षक अर्ज देऊन गैरहजर राहत असताना दुसऱ्या दिवशी त्यांची रजिस्टरवर हजेरी लावली जाते, असा आरोप के.डब्ल्यू. खोब्रागडे या शिक्षकाने करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.जिल्हा परिषद नूतन विद्यालय मुंढरी येथे ५ ते १० मध्ये २९५ विद्यार्थी आहेत. मुख्याध्यापकांसह पूर्ण वेळ शिक्षक ९, तासिकेवरील ३, निदेशक ३ असे १५ शिक्षक कार्यरत आहेत. १६ जानेवारी रोजी शैक्षणिक सहल नागपूर येथे नेण्यात आली. सहलीला ४० विद्यार्थी गेले. उर्वरीत २५५ विद्यार्थ्यांसाठी सकाळपाळीत शाळा ठेवण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी सहल असताना त्या सहलीला पूर्ण वेळ शिक्षकांपैकी मुख्याध्यापकांसह ६ शिक्षक गेले. तासिकेवरील २ शिक्षक व विषय निदेशक १ व परिचर असे १० जण गेले. सहलीच्या नावावर शाळा वाऱ्यावर सोडण्यात आल्यामुळे सहल शिक्षकांसाठी की विद्यार्थ्यांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळ पाळीची जबाबदारी आर.डी. बंसोड यांचेकडे सोपविण्यात आली. त्यांच्या सोबतीला आर.डी. बंसोड, के.डब्लू. खोब्रागडे, डी.एच. बघेले, कर्मचारी डी.एल. उईके, लिपीक लांजेवार, निदेशक गोंधुळे, भडके उपस्थित होते.ऋती कुंभरे व प्रिती बांडेबुचे या विद्यार्थिनींना विचारले असता, आम्ही दररोजच स्वत:च वर्ग व परिसराची सफाई व स्वच्छता करीत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.शाळेत कोणत्याही प्रकारचे भेदभावपूर्ण काम केले जात नाही. शैक्षणिक सहल असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्षक आले आहेत. यासंबंधी अधिक माहिती शाळेत आल्यावर देण्यात येईल.- हेमराज दहिवले, मुख्याध्यापक नूतन विद्यालय मुंढरी.साफसफाईसाठी चार कर्मचारी असून विद्यार्थ्यांकडून साफसफाई केली जात नाही. शाळेत नेहमी भेट दिली जाते. हजेरी रजिस्टर तपासले जातात. शिक्षक खोब्रागडे सांगत असलेली माहिती चुकीची आहे.-सरिता चौरागडे, जि.प. सदस्या मुंढरी.