शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:51 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात एकता, समानता आणि न्याय देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र संविधान लिहिले. याच संविधानामुळे नारिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मुलभूत अधिकार मिळाले आहे.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : गोंदिया तालुक्यात ठिकठिकाणी प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात एकता, समानता आणि न्याय देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र संविधान लिहिले. याच संविधानामुळे नारिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मुलभूत अधिकार मिळाले आहे. मात्र विद्यमान भाजप सरकार यात बदल करण्याचा प्रयत्न करीत नागरिकांच्या हक्क आणि मुलभूत अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. संविधानात बदल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवून त्यांची जागा दाखवून द्या असे प्रतिपादन खा.प्रफुल्ल पटेल यांनी केले.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाआघाडीचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी गोंदिया तालुक्यातील खमारी, फुलचूर, नागरा, मरारटोली, कुडवा येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.आमदार गोपालदास अग्रवाल, उमेदवार नाना पंचबुध्दे, उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल म्हणाले, जेव्हा राजधानी दिल्लीत संविधानाच्या प्रतिकात्मक प्रती जाळून संविधानाचा अवमान केला जात होता. तेव्हा स्वत:ला देशाचा चौकीदार समजणारे कुठे होते असा सवाल केला.मागील ७० वर्षांपासून देशाची लोकशाही ज्या संविधानाच्या आधारावर सुरू आहे. त्यामुळे देशात एकता, समानता, बंधूता टिकून त्याच संविधानाला बदलण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ता शेतकऱ्यांच्या मुलांना लावारिस म्हणत आहे. ज्यांनी मागील पाच वर्षात केवळ आश्वासनाशिवाय काहीच दिले नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची हिच वेळ असल्याचे सांगितले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019bhandara-gondiya-pcभंडारा-गोंडिया