शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोशिंद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला धडा शिकवा

By admin | Updated: August 30, 2014 23:26 IST

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी कर्जबारी होऊन मरणाच्या खाईत लोटत आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले असून राज्य शासन निगरगट्ट बनले आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला

आमदार भोंडेकर यांचे आवाहन : भंडारा येथे धरणे भंडारा : जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी कर्जबारी होऊन मरणाच्या खाईत लोटत आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले असून राज्य शासन निगरगट्ट बनले आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला धडा शिकवून सत्तेतून हद्दपार करा, असे आवाहन शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले. शिवसेनेच्या वतीने आज येथील त्रिमूर्ती चौकात आमदार भोंडेकर व जिल्हा प्रमुख राधेश्याम गाढवे यांच्या नेतृत्वात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. भोंडेकर म्हणाले, राज्य शासनाचे अनेक मंत्री घोटाळ्यात अडकले आहेत. अशा घोटाळेबाज सरकारकडून सामान्य जनतेने काय अपेक्षा ठेवावी. शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे थोतांड राज्य सरकार करीत आहेत. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना होत नाही. सरकारी कार्यालयात वारंवार चकरा मारूनही त्यांचे काम होत नाही. सरकाराचे नियंत्रण नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी व शेतकरी विरोधी सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी जनतेने सज्ज रहावे, व येत्या निवडणुकीत त्यांना सत्तेपासून दूर ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. या आंदोलनात जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा, अतिवृष्टीचे पैसे त्वरीत द्यावे, शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा द्यावा, रेशनकार्ड त्वरीत वितरीत करावे, प्रकल्प बाधितांना त्वरीत अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांचे वीज जोडणी कापू नये, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचे प्रकरणे त्वरीत निकाली काढावे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. सदर मागण्यांचे निवेदन आमदार भोंडेकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने भंडाऱ्याचे तहसीलदार सुशांत बनसोडे यांना दिले. आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख हेमंत बांडेबुचे, सुनिल कुरंजेकर, प्रशांत लांजेवार, अनिल गायधने, राजु थोटे, उमराव सेलोकर, बबलु आथिलकर, सतीश तुरकर, नरेश झलके आदींसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)