शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नौटंकी करणाऱ्यांना धडा शिकवा

By admin | Updated: January 17, 2015 22:53 IST

भंडारा व गोंदिया जिल्ह्यात धान व ऊसाच्या आधारभूत किमतीकरीता मोर्चे काढणारे आता सत्तेवर येताच मौन बाळगून आहेत. मागील १५ वर्षांत विधीमंडळात न बोलता रस्त्यावर आंदोलन करून

अनिल देशमुख यांचे आवाहन : तुमसरात काँग्रेस तालुका अध्यक्षांचा राकाँत प्रवेश तुमसर : भंडारा व गोंदिया जिल्ह्यात धान व ऊसाच्या आधारभूत किमतीकरीता मोर्चे काढणारे आता सत्तेवर येताच मौन बाळगून आहेत. मागील १५ वर्षांत विधीमंडळात न बोलता रस्त्यावर आंदोलन करून सहानुभूती मिळविली. भाजपचे आमदार व खासदार एक शब्दही बोलत नाहीत. या नौटंकी करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केले.तुमसरात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे होते. अतिथी म्हणून आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, मधुकर सांबारे, विजय डेकाटे, नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, जिल्हा परिषद सदस्य किरण अतकरी, नलिनी कोरडे, कल्याणी भुरे, रामदयाल पारधी उपस्थित होते.यावेळी तालुका काँगे्रेस कमेटीचे अध्यक्ष विठ्ठल कहालकर, काँगे्रसचे पं.स. सदस्य राजेश रहांगडाले, माया गौपाले, यादोराव पटले सुखशाम येळे, कोठीराम ठवकर, शालिक गौपाले, कवळू पारधी, लाला गौपाले, शरद रेहपाडे, श्यामराव ठाकरे, किशोर परतेती, राहुल देशभ्रतार, खेमराज पंचबुद्धे यांच्यासह तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी राकाँमध्ये प्रवेश केला. त्या कार्यकर्त्यांचे देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी आ. राजेंद्र जैन म्हणाले, देव्हाडा येथील साखर कारखान्यात केवळ १७०० ते १८०० रूपये भाव दिला जात आहे. राज्य शासनाने धानाला केवळ ५० रूपये वाढीव भाव दिला. याविरोधात खासदार, आमदार आंदोलने का? करीत नाही. असा आरोप करुन त्यांच्या करणी व कथनीत अंतर असल्याचा आरोप केला. यावेळी नाना पंचबुद्ध, राजकुमार माटे, यादोराव पटले यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव कहालकर यांनी केले. संचालन तालुका अध्यक्ष देवचंद ठाकरे यांनी तर आभारप्रदर्शन पंचायत समिती सदस्य सुधाकर कहालकर यांनी केले. यावेळी नगरसेवक राजेश देशमुख, मीना गाढवे, शिला धार्मिक, सरोज भुरे, जि.प. सदस्य सुरेश रहांगडाले, देवसिंग सव्वालाखे, पं.स. सदस्य मनोज वासनिक, विठ्ठल रहमतकर, योगेश सिंगनजुडे, रामदास बडवाईक, दिलीप सोनवाने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)