शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

फसवणूक करणाऱ्या भाजपाला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:29 IST

अजूनही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. धानाला योग्य भाव नाही. तुडतुडयाच्या लाभासाठी अजूनही शेतकरी चकरा मारत आहेत. पंधरा लक्ष रुपये बँकेत आले नाही. अच्छे दिन भाजपाचे आले. बेरोजगारांचे हात रिकामेच आहेत. बेरोजगार व शेतकऱ्यांना फसविणाऱ्या भाजपाला धडा शिकविण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : हरदोली येथे शेतकरी मेळावा, दुर्गा मंदिरात कलश पूजन व इमारतीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : अजूनही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. धानाला योग्य भाव नाही. तुडतुडयाच्या लाभासाठी अजूनही शेतकरी चकरा मारत आहेत. पंधरा लक्ष रुपये बँकेत आले नाही. अच्छे दिन भाजपाचे आले. बेरोजगारांचे हात रिकामेच आहेत. बेरोजगार व शेतकऱ्यांना फसविणाऱ्या भाजपाला धडा शिकविण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.हरदोली/झंझाड येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. उपस्थित शेतकरी, बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करताना खासदार पटेल बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे नेते माधवराव बांते होते.मंचावर खासदार मधुकर कुकडे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुधे, माजी आमदार अनिल बावनकर, राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष राजू कारेमोरे, रामलाल चौधरी, डॉ. पंकज कारेमोरे, विठ्ठल कहालकर, राजू माटे, श्रीकृष्ण पडोळे, आशिष पात्रे, हरिभाऊ डोये, किरण अतकरी, धनंजय दलाल, विजय पारधी यासह निता झंझाड, प्रदीप बुराडे, शाम कांबळे, प्रभाकर उपरकर, सुरेश घरजारे, भगतसिंह दमाहे, रिता हलमारे, मंसाराम बुधे, त्रीशुला दमाहे, विनोद वैद्य, तुलाराम हारगुळे, सवीता बाहे, मार्तंड झंझाड, राधेशाम गाढवे, ईसन जीभकाटे, राजू उपकर, रविंद्र झंझाड, ईश्वर माटे, छगन बिल्लोरे, कमलेश कनोजे, ज्योती झंझाड, हिरा झंझाड, सुझान झंझाड, संगीता झंझाड यांची उपस्थिती होती.यावेळी प्रफुल्ल पटेल यांचे हस्ते दुर्गा मंदिरात कलश पूजन व इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. जाहिरातबाज व मृगजळात फरवणारी ही भाजपाची मंडळी आमचेच खरे असल्याचे भासविले. शेतकºयांना कर्जमाफीच्या रांगेत लावून त्यांच्या अपमान करणाऱ्या भाजपाला आता घरची रस्ता दाखवा असे आवाहन खासदार मधुकर कुकडे यांनी केले. अध्यक्षस्थानावरुन किसान सभेचे नेते माधवराव बांते यांनी, शेतकºयांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पेंचच्या पाण्याचे राजकारण केले गेले. भाजपाच्या अडवणूक धोरणामुळे शेवटच्या टोकापर्यंत पेंचचे पाणी आले नाही. त्यामुळे शेतकºयांचे धानाचे उभे पिक करपले.यावेळी सुनिल फुंडे, विठ्ठल कहालकर, अनिल बावनकर, राजू माटे आदींची मेळाव्यात भाषणे झाली. वृध्द कलावंत शामराव झंझाड, गंगाधर तांदुळकर, पुरुषोत्तम झंझाड यांचा शाल, श्रीफळ देवून खासदार प्रफुल्ल पटेलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक सरपंच सदाशिव ढेंगे यांनी केले. संचालन हटवार, पारधी यांनी तर आभार पोलीस पाटील पंढरी झंझाड यांनी केले. मेळाव्यासाठी रामू पवनकर, उपसरपंच मनोज झंझाड, राजेश बुरडे, लक्ष्मीकांत सार्वे, प्रकाश बांते, विलास झंझाड, राजू कुर्वेकर, स्वप्नील माटे, मंगल झंझाड, नितेश तांदुळकर, रमेश बांते, अंजना कुर्वेकर, ललिता शेंडे, विजया सार्वे, हिरामन झंझाड आदींनी सहकार्य केले.हर्षलचा सत्कारपिंपळगांव/झंझाड येथील बाल संशोधक हर्षल झंझाड यांने मीनी एटीएमचे प्रात्यक्षिक व्यासपीठावर दाखविले. या बाल शास्त्रज्ञाचा सत्कार खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आला.